Friday, February 3, 2023

जेव्हा पैशांसाठी भावाप्रमाणे जीव लावणाऱ्या सलमानला नडलेला जॉन अब्राहम, पुढं काय झालं वाचाच

तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूडचा सल्लू भाई येणार नाही असं कधीच होणार नाही. दिलखुलास, हँडसम, बॉडीबिडी असणाऱ्या सलमानवर आजही अनेक तरुणी अक्षरश: जीव ओवाळून टाकतात. पण तुम्हाला माहितीये का? याच ‘दबंग’ खानचे एकेकाळी चांगली मैत्री असणाऱ्या अभिनेत्यांसोबत खटके उडालेत. यापैकीच एक म्हणजे डॅशिंग जॉन अब्राहम. एकेकाळी त्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. पण असं काय झालं, ज्यामुळे त्यांच्या मैत्रीत एवढा दुरावा आला आणि ते एकमेकांचा रागराग करू लागले? हे सर्व आपण या जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.

सलमान आणि जॉन नेहमीच आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात, पण त्यांचं सुद्धा एका कारणावरून भांडण झालं होतं. त्यांचं भांडण हे 2006 पासून सुरू होतं जे आजसुद्धा कायम आहे. त्यांच्या भांडणाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांची मैत्री कशी झाली, हे जाणून घेऊया…

तर तो सिनेमा होता ‘बाबूल.’ याच सिनेमातून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती. दोघांचीही बॉडी जबरदस्त. त्यामुळं शूटिंगदरम्यान त्यांचं बॉडीवरून चांगलंच जमायचं. या बॉडीमध्ये दोघेही हॉट दिसायचे. शूटिंगवेळीच त्यांची मैत्री घट्ट झाली. पण, जॉनला हे माहिती नव्हतं की, सलमान जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करतो, तेव्हा तो त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाप्रमाणे जीव लावतो.

एकदा ‘बाबूल’ शूटिंग वेळेस सलमान हा इंटरनॅशनल रॉकस्टार टूरसाठी निघाला होता, तेव्हा त्याने जॉनला सोबत घेऊन जायचा विचार केला. जॉन आणि सलमान हे दोघे तिथे पोहोचले, तेव्हा तिथे एक परफॉर्मन्स झाला. त्या परफॉर्मन्सवरून सलमान आणि जॉन यांच्यात पैश्यांसाठी बोलण झालं, तेव्हा सलमान जॉनला म्हणाला की, एवढ्याच पैशांसाठी काम कर आणि थोडे चार्ज कमी कर. त्यावेळी जॉन तिथे अडला आणि त्याने तेवढेच पैशांची मागणी केली. याच कारणामुळे त्या दोघात चांगलेच वाद झाले.

असं म्हंटलं जातं की, जेव्हा सलमान टूरवर जातो, तेव्हा त्याचा शो सर्वात हिट होतो. मात्र, या शोबद्दल बोलायचं झालं, तर यावेळी जॉनची चांगलीच वाहवा झाली होती. त्यामुळेच सलमानचा इगो हर्ट झाला. सलमानला असं वाटत होतं की, जॉन या रॉकस्टार टूरचा भाग आहे आणि तो त्याच्यासोबत राहील. तसेच त्याच्यासोबत चांगले संबंध ठेवेल, पण असं झालं नाही. सलमान जॉनला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते नाही झालं. तेव्हापासूनच त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि हे ‘बाबूल’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पुढे आले. त्यांच्यात एवढे वाद झाले की, अक्षरश: सिनेमाचे निर्माते रवी चोप्रा हे सुद्धा वैतागले आणि नाईलाजानं अमिताभ बच्चन याना मध्ये पडावं लागलं. त्या दोघांना सुद्धा नीट समजावून सांगितले आणि नंतर सिनेमाची शूटिंग सुरू झाली, पण माध्यमांमध्ये असं म्हटलं जातं की, या दोघांनी शूटिंग संपेपर्यंत एकमेकांसोबत संवादही केला नाही आणि एकमेकांकडे वळूनसुद्धा बघितलं नाही.

जेव्हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि फार गाजला नाही, तेव्हा एका मुलाखती दरम्यान सलमानने सांगितलं होतं की, याचा दुसरा भाग हा काय इतका चांगला नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तो म्हणाला की, पहिल्या भागात मी काम केलं आणि दुसऱ्या भागात जॉन अब्राहमने काम केलं. त्याच्या या वक्तव्यामुळं हे समजतं की, ‘बाबूल’ हा सिनेमा फ्लॉप व्हायचे कारण जॉन अब्राहम असल्याचे तो सांगतो.

जेव्हा त्या दोघांची मैत्री होती, तेव्हा त्या दोघांनी ‘सलाम- ए- इश्क’ या सिनेमामध्ये एकत्र काम करणार होते, पण त्यांच्यातील वादामुळे त्यांनी कोणत्याच सिनेमात एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही, तर सलमान आणि जॉन अब्राहम या दोघांचं ‘साहेब, बीवी और गुलाम’ या पुढील सिनेमासाठी सिलेक्टही झाले होते, आणि प्रितीश नांडी हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते आणि रितुपर्ण घोष यांचा हा सिनेमा होता. या सिनेमामध्ये सलमान खान हा जमीनदाराची भूमिका निभावणार होता, तर जॉन अब्राहम हा भूतनाथची भूमिका साकारणार होता. तसेच या सिनेमात ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा ही या सिनेमामध्ये लीड रोल करणार होती. एवढंच नाही, तर या सिनेमाचा पोस्टरसुद्धा रिलीज झाला होता. पण तो सिनेमा काही बनलाच नाही. (salman khan and john abraham fight)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्याच्यावर ठेवला विश्वास त्यानेच दिले चुकीचे उत्तर, स्पर्धकाने गमावले एवढे लाख

देवोलीना भट्टाचार्जी आपल्या पतीला मिठी मारून रडली ढसाढसा; म्हणाली, ‘दिव्याने शोधले असते…’

हे देखील वाचा