Monday, July 1, 2024

नाद करायचा नाय! बॉलिवूडमधील बॉडी शेमिंगमुळे ट्रोल करणाऱ्यांना ‘या’ ५ अभिनेत्रींनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

चित्रपसृष्टीमध्ये बॉडी शेमिंगला खूप महत्त्व दिले जाते. यामुळेच अनेक अभिनेत्री याला बळी पडल्या आहेत. अनेक अभिनेत्री आपले फिटनेसाठी जिममध्ये तासंतास घाम गाळत असतात. त्याचबरोबर दररोज योगाही करत असतात. जेणेकरून त्या बॉडी शेमिंगसारख्या घृणास्पद गोष्टीला बळी पडू नयेत. मात्र, जिममध्ये तासंतास घाम गाळून देखील त्यांना अनेकदा फिटनेसवरून ट्रोल केले जाते.

अभिनेत्रींच्या प्रेग्नंसीच्या काळात आणि प्रसूतीनंतर त्यांच्या शरीरामध्ये खूप बदल होतात. याच कारणामुळे त्यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. कारण ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडत असते. मात्र, अशा गोष्टींवर सोशल मीडिया युजर्सची नजर पडताच ते कित्येक अभिनेत्रींना त्यांच्या लूकमुळे ट्रोल करतात. अनेक अभिनेत्री अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात, तर काही अभिनेत्री ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देत असतात. आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

नेहा धुपिया
नेहा धुपिया बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या निर्दोषतेसाठी ओळखली जाते. अनेकवेळा ट्रोल झाल्यानंतर ती सोशल मीडियावर लोकांना चोख प्रत्युत्तर देताना दिसली आहे. जेव्हा नेहाने मुलगी मेहरला जन्म दिला, तेव्हा तिचे खूप वजन वाढले होते. त्यामुळे नेहा त्या दिवसात खूप ट्रोल झाली होती. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत लोकांना प्रतिसाद दिला. ती म्हणाली की, “मला ही एक मोठी समस्या म्हणून संबोधायची आहे, कारण केवळ सेलिब्रिटींनाच नव्हे, तर प्रत्येकासाठी फॅट-शेमिंग थांबवणे आवश्यक आहे.”

विद्या बालन
विद्या बालन ही बॉलिवूडची खरी सिंहिणी आहे. तिच्या मस्त वागण्यामुळे ती नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. विद्या बालनला अनेकदा सोशल मीडियावर चाहते स्लिम होण्याचा सल्ला देतात, तरीही विद्याने नेहमीच योग्य उत्तरे देऊन त्यांना गप्प केले आहे. एकदा विद्या बालनने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला आयुष्यभरासाठी हार्मोनल समस्या आहेत. हे बहुधा माझ्यामुळे आहे. मी किशोर असताना, लोक मला सांगायचे, तुझा चेहरा खूप सुंदर आहे, तू वजन का कमी करत नाहीस?”

सोनाक्षी सिन्हा
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार बनते. तिच्या लूकवर चाहत्यांनी अनेक वेळा तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्याचा सोनाक्षीने धैर्याने सामना केला आहे. अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, माझे वजन शाळेच्या दिवसांपासून जास्त आहे. लहानपणी माझे वजन ९५ किलो होते. लोक मला गुंड म्हणत असत, पण मी मुलांच्या अशा बोलण्याला मनापासून घेत नव्हते. मला माहिती आहे की, माझे वजन आणि साईज जास्त आहे.

ऐश्वर्या राय
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या रायसुद्धा बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. जेव्हा अभिनेत्रीने आपली मुलगी आराध्याला जन्म दिला होता, तेव्हा तिचे वजन खूप वाढले होते. अशा परिस्थितीत तिला खूप ट्रोल केले होते. एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, “तुम्ही लोक मला पाहिजे तितके ट्रोल करू शकता.”

झरीन खान
‘हेट स्टोरी ३’ अभिनेत्री झरीन खान तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. झरीनला तिचे वजन आणि साईजमुळे अनेकदा ट्रोल केले जाते. काही काळापूर्वी अभिनेत्रीने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यावर लोकांनी झरीनला तिच्या पोटाच्या त्वचेमुळे ट्रोल केले होते. मात्र, अभिनेत्रीने सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले.

जरीनने लिहिले होते की, ‘ज्याला माझ्या पोटाला काय झाले हे जाणून घ्यायचे आहे, हा मेसेज त्यांच्यासाठी आहे. ज्या व्यक्तीने आतापर्यंत ५० किलो वजन कमी केले आहे त्याचे हे नैसर्गिक पोट आहे. आता असे दिसते. हे कोणत्याही प्रकारे फोटोशॉप केलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन केले गेले नाही. मी खरोखर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक आहे. ते झाकण्याऐवजी मी माझे दोष अभिमानाने स्वीकारले.’

झरीनने सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ विचित्र कारणामुळे धरम पाजी खाऊन यायचे कांदा, वैतागलेल्या आशाजींनी थेट दिग्दर्शकाकडे केली होती तक्रार

-वर्षातून दोनवेळा वाढदिवस साजरा करतो अभिनेता रोहित रॉय, कारण ऐकुन तर तुमच्याही उंचावतील भुवया!

-करिअरच्या सुरुवातीला क्रितीला असायची ‘या’ गोष्टीची भीती, ‘टू-पीस’ घालायलाही अभिनेत्रीने दिला होता नकार

हे देखील वाचा