Friday, April 19, 2024

करिअरच्या सुरुवातीला क्रितीला असायची ‘या’ गोष्टीची भीती, ‘टू-पीस’ घालायलाही अभिनेत्रीने दिला होता नकार

 

बॉलिवूडची अभिनेत्री क्रिती सेनन हिने खूप कमी वेळात आणि कमी दिवसात आपल्या उत्कृष्ट कामाने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. क्रितीने तिच्या आठ वर्षांच्या करिअरमध्ये एकुण १० चि्त्रपट केले आहेत. तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तिने ‘सरोगेट’ आईची भूमिका साकारली. ज्याला चाहत्यांना खूप पसंती दर्शवली. नुकताच क्रितीचा एक जुना ऑडिशन व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये क्रितीने स्वतःची ओळख करून देते आणि सांगते की, ती पाच फूट आणि नऊ इंच उंच आहे. यानंतर ती आत्मविश्वासाने हसत म्हणते की, तिला टू पीस घालणे सोयीचे वाटत नाही. याशिवाय या व्हिडिओमध्ये ती अभिनय करताना देखील दिसत आहे. व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ अभिनेत्रीच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांचा आहे. (kriti sanons first audition video went viral the actress said i am not comfortable in two piece)

 

क्रितीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना म्हटले की, असेही दिवस होते, जेव्हा ती चिडायची आणि सतत चिडचिड करायची. त्या दिवसात तिला काम नसल्याने ती रडायची देखील. ती म्हणाली, “पण माझ्याकडे असे लोक होते, ज्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि अशा वेळी आपल्याला यांची गरज असते, असं मला वाटतं. यामुळे मला खूप धैर्य मिळाले आहे.”

यासोबतच क्रितीने २०१४ मध्ये टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच तिने २०१७ च्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाद्वारे आपली ओळख निर्माण केली. क्रिती सेनन सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे. ज्यात ‘आदिपुरुष’, ‘बच्चन पांडे’, ‘भेडिया’, ‘शेहजादा’ आणि ‘हम दो हमारे दो’ समाविष्ट आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा