Thursday, June 26, 2025
Home अन्य लग्नानंतर बोल्ड आणि किसींग सीन करण्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली ‘मला असे सीन…’

लग्नानंतर बोल्ड आणि किसींग सीन करण्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली ‘मला असे सीन…’

टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे या दिवसात ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमध्ये अनिता भाभीची भूमिका निभावत आहे. याआधी ‘सौम्या टंडन’ ही भूमिका निभावत होती. परंतु आता नेहाने नवीन अनिता भाभीच्या रुपात या मालिकेत प्रवेश केला आहे. नेहाने याच वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड शार्दुल ब्यास याच्यासोबत लग्न केले आहे. यानंतर तिने भविष्यात बोल्ड सीन करण्याबाबत खुलासा केला आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नेहाने खुलासा केला की, “बोल्ड सीन करण्यात मला काहीही अडचण नाहीये. परंतु आता चित्रपटात किसींग आणि प्रेमाचे जास्त सीन असतात. एक काळ असा होता जेव्हा मला वाटतं होते की, मी हे असे सीन करणार नाही. जर माझ्याकडे टॅलेंट आहे, तर त्याच्या जोरावर मी काम मिळवेल. परंतु जर आता चित्रपटसृष्टीत जर याच गोष्टींना मागणी असेल, तर असे सीन करायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु असे काही चित्रपट आसतात ज्यात फक्त किसींग सीन आणि बोल्ड सीन असतात. अशा चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा नाहीये.”

“मी अनेक बोल्ड सीन बघितले आहे. पण ते यामुळे चांगले दिसत होते की, निर्मात्यांनी ते सीन चांगल्याप्रकारे मांडेल होते. या सीनला बघून तुम्हाला अजिबात असे वाटणार नाही की, तुम्ही कायतरी असे बघत आहात, जे तुम्हाला आवडत नाही. नाहीतर अनेक वेळा असे सीन खूप चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. मी काही या गोष्टीच्या विरोधात नाहीये. हे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे,” असेही नेहा पुढे बोलताना म्हणाली.

नेहाने या दिवसात भाभी जी घर पर है या मालिकेतील अनिता भाभी या पात्राने खूपच चर्चित आहे. परंतु या आधी देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहा नेहमीच चेचेत असायची. कधी तिच्या वाढलेल्या वजनामुळे, तर कधी कमी झालेल्या वजनामुळे तिला ट्रोल केले जात असे. अगदी काही ट्रोलरने तर तिच्या पतीच्या वजनावरूनही तिला ट्रोल केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-आहा! ‘५२ गज का दामन’ गाण्यावर ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हे देखील वाचा