Tuesday, April 29, 2025
Home साऊथ सिनेमा ‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

नित्‍या मेनन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्‍नड- सगळ्याच भाषांमध्ये हिट सिनेमे केले आहेत. २०१९मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालनचा सिनेमा ‘मिशन मंगल’ यातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारी दाक्षिणात्य सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री नित्‍या मेनन, सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. असं वाटत आहे की, या ३४ वर्षीय प्रतिभावान अभिनेत्रीने लग्न करण्यासाठी तिच्या मनाची पूर्ण तयारी केली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, नित्‍या (Nithya Menen) एका प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच ते लग्न करणार असल्याचेही समजले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिनेसृष्टीत पाऊल टाकायच्या आधीच नित्‍याची ओळख, तिच्या प्रेमासोबत झाली होती. त्यांच्या मैत्रीचं रूपांतरण प्रेमात झालं आणि मागील काही दिवसांपासून दोघेही एकमेकांसोबत आहेत.

आई-वडिलांकडूनही लग्नासाठी हिरवा कंदील
असं म्हटलं जात आहे की, दोघांनीही आपल्या घरच्यांना लग्नासाठी मनवले आहे आणि ते तयारही झाले आहेत. परंतु अद्याप नित्‍याने या सगळ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहते नित्‍याच्या प्रतिक्रियेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nithya Menen (@nithyamenen)

नित्‍या आणि सिनेसृष्टी
नित्‍या अगदी दहा वर्षांची असल्यापासून, अभिनयक्षेत्रात काम करत आहे. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा तिचा प्रवास, अतिशय उत्तम होता. १७ वर्षांची असताना तिने तिचा पहिला सिनेमा केला जो कन्नडमध्ये होता. २०१९मध्ये तिने अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विद्या बालनचा (Vidya Balan) सिनेमा ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) यातून बॉलिवूड पदार्पण केले होते. यातील तिच्या पात्राला प्रेक्षकांनी खास पसंती दिली होती.

नित्‍या मागच्यावेळी ‘भिमला नायक’ या चित्रपटामध्ये झळकली होती. आताही ती ‘मॉर्डन लव्ह मुंबई’ (Modern Love Mumbai) या सीरिजच्या दुसऱ्या पर्वात दिसू शकते. यामध्ये ती एका भागात अभिनेत्री रेवती (Revathy) हिच्यासोबत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर (Nagesh Kukunur) यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चाहत्यांसाठी खुशखबर! राणादा आणि पाठक बाईंची जोडी झळकणार ‘या’ बिगबजेट चित्रपटात

‘जो दिखता है, वो बिकता है’ उर्फी जावेदने ट्रान्सपरेंट कटआऊट ड्रेस परिधान करताच भडकले चाहते

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार गुड न्यूज? माध्यमांमध्ये चर्चा रंगल्यानंतर स्वतःच केला खुलासा

हे देखील वाचा