Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड काळजात घंटी वाजते! नोरा फतेहीचा ‘त्या’ बोल्ड फोटोने लावले चाहत्यांना वेड; म्हणाली, ‘माझ्यासोबत यायचं का?’

काळजात घंटी वाजते! नोरा फतेहीचा ‘त्या’ बोल्ड फोटोने लावले चाहत्यांना वेड; म्हणाली, ‘माझ्यासोबत यायचं का?’

कमी काळात बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त यश मिळवणे हे कोणत्याही कलाकारासाठी खूप कठीण काम असते. मात्र, काही कलाकार असेही असतात, जे ही कठीण वाटणारी गोष्टही सहजरीत्या पार करतात. या कलाकारांमध्ये समावेश होतो, तो म्हणजे अभिनेत्री नोरा फतेहीचा. खूप कमी काळात नोराने इंडस्ट्रीत आपले स्थान मिळवले आहे. सिनेमात आणि आयटम साँग्ससोबतच नोरा आपल्या हॉटनेससाठीही ओळखली जाते. तसेच ती आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळेही चांगलीच चर्चेत असते. नोराच्या हॉटनेस आणि बोल्डनेसचे तर सगळेच दीवाने आहेत. मग तिने भारतीय पोषाख घातलेला असो, किंवा वेस्टर्न असो, किंवा मग बिकिनी. ती प्रत्येक लूकमध्ये एकदम कडक दिसते. अशातच तिचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.  

नोरा फतेहीचे (Nora Fatehi) एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तीदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले नवनवीन हॉट आणि ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने असंच काहीसं केलं आहे. तिच्या एका फोटोने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. या फोटोतील नोराची सुंदरता पाहून कुणीही घायाळ होईल.

नोराने शेअर केलेल्या या फोटोत ती स्वीमिंग पूलच्या समोर उभी आहे. तसेच आपल्या फोनमध्ये पाहत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या फोटोत ती कमालीची हॉट दिसत आहे. काळ्या रंगाच्या बिकिनीसोबतच नोराने आपले केस मोकळे सोडले आहेत. तसेच सोनेरी कानातलेही घातले आहे, जे तिचा लूक परिपूर्ण बनवत आहे.

हा फोटो शेअर करत तिने मजेशीर कॅप्शनही दिले आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुढील सुट्टीची प्लॅनिंग करत आहे. तुम्हालाही जॉईन करायचंय का?”

तिने शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत २४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर २५ हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “थांब आधी माझ्या आईला विचारूदे.” तसेच आणखी एका युजरने कमेंट केली की, “बुलाती है मगर जाने का नहीं.”

नोराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहेत. तिने ‘साकी साकी’, ‘एक तो कम जिंदगानी’, ‘कमरिया’ ही तिची गाणी सुपरहिट ठरली आहेत. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.

हे देखील वाचा