×

जाळ अन् धूर संगटच! भर थंडीत बिकिनी घालून नोरा फतेहीने स्विमिंग पूलमध्ये लावली आग

आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नोरा फतेहीचाही समावेश होतो. डान्स आणि अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पाडतात. नोरा नेहमी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्याच तिचा स्विमिंगपूलमधील बिकिनीतील फोटो व्हायरल होत आहेत.

नोराच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, नोराने (Nora Fatehi) लेपर्ड प्रिंटची बिकिनी घातली असून तिचे केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडिओच्या बॅग्राऊंडला ‘बागी ३’ मधील ‘डू यू लव्ह मी’ हे गाणे वाजत आहे. दिशा पटानीचा किलर परफॉर्मन्स असलेल्या या गाण्यावरचा नोराचा हा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

तसे, नोराने याआधीही सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या नोराने आपल्या म्युझिक व्हिडिओंनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नोरा आपल्या डान्ससाठी ओळखली जाते.

View this post on Instagram

A post shared by Nᴏʀᴀ Fᴀᴛᴇʜɪ (@norafatehiattraction)

नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहेत. तिने ‘साकी साकी’, ‘एक तो कम जिंदगानी’, ‘कमरिया’ ही तिची गाणी सुपरहिट ठरली आहेत. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nᴏʀᴀ Fᴀᴛᴇʜɪ (@norafatehiattraction)

अलीकडेच ‘भुज- द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली गाणी सुपरहिट होत आहेत. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘क्रिश ४’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा-

Latest Post