Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड नोरा फतेहीच्या संस्कारी लूकला भुलला चाहतावर्ग, सोशल मीडियावर घातली थेट लग्नाची मागणी!

नोरा फतेहीच्या संस्कारी लूकला भुलला चाहतावर्ग, सोशल मीडियावर घातली थेट लग्नाची मागणी!

बॉलिवूडमध्ये अनेक हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ज्या त्यांच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करतात. वेस्टर्न आणि पारंपारिक ड्रेसमध्ये त्या नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असतात. पण स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत अभिनेत्री नोरा फतेही हिची गोष्ट काही वेगळीच आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री करून तिने काही जास्त काळ लोटला नाही. पण तरीही आज ती अनेक अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे. तिच्या अंदाजाने ती नेहमीच चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. अशातच नोराने तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या प्रेक्षकांचे खास आकर्षण बनले आहेत.

नोरा फतेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने क्रीम कलरची आणि लाल रंगाची बॉर्डर असलेली वर्क केलेली साडी नेसली आहे. तसेच तिने डोक्यावर पदर घेतला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तसेच तिने यावर हेवी ज्वेलरी परिधान केला आहे, कपाळी टिकली लावली आहे. यामध्ये ती एका भारतीय संस्कारी मुलीप्रमाणे दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या असा सगळा साजशृंगार तिने केला आहे.

तिच्या चाहत्यांना तिचा हा संस्कारी लूक खूप आवडला आहे. सगळेजण या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे की, “सुंदर, सुशील नारीचे रूप.” तर दुसऱ्या एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली आहे. त्या चाहत्याने लिहिले आहे की, “माझ्याशी लग्न करशील का ?” अशाप्रकारे तिच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी देखील नोराने तिचे अनेक साडीमधील फोटो शेअर केले होते. पण हा फोटो तिच्या चाहत्यांचे खास आकर्षण बनला आहे. (actress nora fatehi looks beautiful in saree, photos get viral on social media )

नोरा ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर ३’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा