Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड ‘तो फक्त ऍडल्ट फिल्मचा हिरो’, रणबीरबद्दलच्या प्रश्नावर नोराचे खळबळजनक विधान

‘तो फक्त ऍडल्ट फिल्मचा हिरो’, रणबीरबद्दलच्या प्रश्नावर नोराचे खळबळजनक विधान

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘शमशेरा‘ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो कधी त्याचा व्हिडिओ शेअर करतो, तर कधी रियॅलिटी शोमध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावतो. त्याच्या या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना भलताच आवडला आहे. यामध्ये तो डाकूच्या रुपात पाहायला मिळत आहे. चाहत्यांना या सिनेमाची खूपच उत्सुकता लागली आहे. मात्र, दुसरीकडे, रणबीरबाबत अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिने वादग्रस्त वक्तव्य केले. तिने रणबीरच्या डान्स स्टेप्सची तुलना ऍडल्ट सिनेमाशी केलीये.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने सन २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सांवरिया’ (Saawariya) या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. या सिनेमातील रणबीर याचे ‘जब से तेरे नैना’ हे गाणे कदाचित सर्वांनीच ऐकले असेल. या गाण्यातील रणबीरने टॉवेल नेसून केलेली डान्स स्टेप्सही सर्वांना लक्षात असेल. मात्र, अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिला रणबीरचा हा डान्स माहितीच नाहीये. त्यामुळे तिने याबाबत असे काही वक्तव्य केले, जे ऐकून रणबीरलाही कदाचित लाज वाटेल. खरं तर, नोराने शोदरम्यान एक मजेशीर खेळ खेळला. यामध्ये तिला प्रसिद्ध कलाकारांचे डान्स मूव्हज ओळखून त्यांचे नाव सांगायचे होते.

नोरा फतेही हिने ‘हेड्स अप’ नावाचा एक मजेशीर खेळ खेळला. इथे तिला डान्स मूव्हजवरून प्रसिद्ध कलाकारांना ओळखायचे होते. तिने प्रसिद्ध कलाकारांचे हुक स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्नही केला. नोरा ही सध्या ‘डान्स दीवाने ज्युनिअर्स’ (Dance Deewane Juniors) शोमध्ये परीक्षक आहे.

तिने यापूर्वी ‘डान्स दीवाने’, ‘इंडिजाय बेस्ट डान्सर’ आणि ‘हुनरबाज’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, नोराने हुक स्टेप्समार्फत प्रसिद्ध कलाकारांच्या नावाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने रणबीर कपूर याच्या ‘टॉवेल डान्स’ला वेगळंच काहीतरी समजले. तिने रणबीर कपूरच्या ‘सांवरिया’ सिनेमातील ‘जब से तेरे नैना’ या गाण्यातील प्रसिद्ध ‘टॉवेल डान्स’मध्ये त्याला ओळखण्यात अपयशी ठरली.

तिने हैराण होऊन विचारले की, “हा एक व्यक्ती आहे? त्याने टॉवेल काढून टाकला? हा कोणता ब्लू सिनेमा आहे?” विशेष म्हणजे, ‘सांवरिया’ सिनेमाच्या चित्रीकरणार निळ्या रंगाचा जास्त वापर दिसून येतो. अभिनेत्री हसत हसत म्हणते की, “हा कोणता खेळ आहे, जो मला तुम्ही खेळायला सांगत आहात?” एवढं मात्र नक्की की, नोराला रणबीरची ओळख पटवण्यात खूप अडचण आली.

योग्य उत्तर न देऊ शकल्याने नोरा फतेही निराश
तिने त्यानंतर रणबीरला ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातील ‘बलम बिचकारी’ या गाण्याच्या हुक स्टेप्सवरून ओळखले. नोराने रणबीरबाबत एक प्रश्नही उपस्थित केला. तिने विचारले की, “त्याने कोणत्या ब्लू फिल्ममध्ये काम केले होते?” नोराला योग्य उत्तर देता न आल्याने ती निराश दिसली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

ललित मोदींच्या संपत्तीपुढे सुष्मिताची संपत्ती ‘पाणी कम चाय’, एका सिनेमासाठी आकारते फक्त ‘एवढे’ कोटी

‘भावा फक्त पैसा पाहिजे, मग सगळं होतं’, सुष्मिता ललित मोदींची गर्लफ्रेंड बनताच मीम्स व्हायरल

‘मी हैराण आहे, मला नव्हतं माहित ती…’, ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिताच्या भावाचे धक्कादायक वक्तव्य

हे देखील वाचा