अभिनेत्री नोरा फतेही बॉलिवूडचा एक चमकता चेहरा बनली आहे. जिने आपल्या डान्सने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. जेव्हाही नोरा एखाद्या गाण्यात दिसली आहे, ते गाणे सुपरहिट झाले आहे आणि तिच्या डान्सला चाहत्यांनी दाद दिली आहे. नोराचे डान्स व्हिडिओ युट्यूबपासून सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. त्यासह नोरा सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आणि चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. क्वचितच असा दिवस जाईल की, नोरा तिच्या हॉटनेसने चाहत्यांना वेड लावत नसेल. अभिनेत्री तिच्या इंस्टाग्रामवर हॉट आणि सिझलिंग फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.
आता अलीकडेच नोराने (Nora Fatehi) इंस्टाग्राम स्टोरीवर तिचे काही मस्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची किलर फिगर दिसत आहे. नोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाच्या पारदर्शक वन-पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचवेळी बूमरॅंग व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिची फिगर फ्लॉंट करत आहे.
नोराने नुकताच तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्रीने वाढदिवस कसा साजरा केला याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले नसले, तरी नंतर तिने काही फोटो शेअर केले. ज्यात ती गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.
यापूर्वी, अभिनेत्रीने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याचे समोर आल्याने नोराच्या चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता. मात्र, काही वेळानंतर नोराचे अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्हेट झाले आणि तिने इंस्टाग्राम डिलीट केले नसून, तिचे अकाऊंट हॅक झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री शेवटची अजय देवगणच्या ‘भुज’ या चित्रपटात दिसली होती. त्याचवेळी, अलिकडेच नोराचे ‘नाच मेरी रानी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. जे पंजाबी गायक गुरु रंधावाने गायले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा –
- जॉन अब्राहमला मिळाले ‘फोर्स’ फ्रँचायझीचे हक्क, लवकरच ‘फोर्स ३’ची तयारी करणार सुरू
- तब्बल ४० वर्षांनंतर परेश रावल करणार गुजराती चित्रपटात काम, ‘डिअर फादर’च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ
- भोजपुरी चित्रपटाचा स्टार यश कुमार अडकला नवीन नात्यात, सहकलाकार निधी झासोबत केली एंगेजमेंट