नोरा फतेही बॉलिवूडचा असा चेहरा बनली आहे, जिने आपल्या डान्सने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. जेव्हाही ती एखाद्या गाण्यात दिसते, ते सुपरहिट झाल्याशिवाय राहत नाही. नोरा फतेहीचे डान्स व्हिडिओ युट्युबपासून सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. नोरा फतेही ही अशी एक अभिनेत्री आहे जिचा वेस्टर्न लूक जितका जबरदस्त आहे, तितकाच तिचा देसी लूक देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो. नोरा फतेहीचा पारंपारिक अवतार चाहत्यांना नेहमीच आवडतो. त्याचवेळी, नुकतेच नोरा फतेहीचे शेअर केलेले फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती ओढणीआड लपलेली दिसत आहे.
नोराचा भारतीय लूक आणि किलिंग पोझ करतात जादू
आजकाल नोराच्या पारंपरिक अवताराला सोशल मीडियावर खूप प्रेम आणि कौतुक मिळत आहे. नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही अतिशय सुंदर फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये नोरा फतेहीने केशरी रंगाचा घागरा परिधान केला आहे. या डिझायनर घागऱ्याने नोराचे सौंदर्य वाढवण्याचे काम केले आहे.
नोराने या भारतीय लूकमध्ये हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज आणि ऑरेंज डिझायनर घागरा कॅरी केला आहे. या सुंदर पारंपारिक अवतारासोबतच या फोटोंमध्ये नोराची जबरदस्त पोझही पाहायला मिळत आहे, जी चाहत्यांची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले की, “फायर.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “हाय गर्मी.” तिच्या या फोटोंना आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
नोराच्या सौंदर्यावर चाहत्यांनी लिहिली शायरी
नोरा फतेहीच्या डान्सला जेवढी पसंती दिली जाते, तेवढीच तिची स्टाईल स्टेटमेंटही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. यामुळेच मुली नोरा फतेहीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. ती ज्या पद्धतीने साडी कॅरी करते आणि शॉर्ट वेस्टर्न ड्रेसमध्ये नोराचा स्टनिंग लूक सादर करते, मुली सोशल मीडियाद्वारे प्रत्येक स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच सोशल मीडियावर नोरा फतेहीची प्रत्येक स्टाईल पाहताच क्षणी व्हायरल होते. नोराच्या या लूकचेही कौतुक होत आहे. तिच्या एका चाहत्याने तिच्या सौंदर्यावर शायरीही लिहिली. त्याने लिहिले की, “चंद्र म्हणत आहे माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही, मी म्हणालो की, अजून नोरा फतेही पाहिली नाही.” त्याची ही शायरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या
-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद
-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी