Friday, April 19, 2024

कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

देशभरात पद्म पुरस्कारांची चर्चा आहे. त्याहीपेक्षा कंगनाच्या या ‘भीक’च्या वक्तव्यानंतर तिचा पुरस्कार परत घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर सोनू सूदने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाला व त्याच्या नावाचा यासाठी विचार केला नाही, या प्रश्नावर तो म्हणाला की, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सोबतच त्याने सांगितले की, त्याचे समाजसेवेचे कार्य सदैव सुरू राहणार. अलीकडेच सोनूने २२ हजार विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

‘आप आणि काँग्रेस दोन्ही पार्ट्या चांगल्या’
सक्रिय राजकारणात येण्याबद्दल सोनू सूद म्हणाला, “मी अशा कोणत्याही व्यासपीठावर सामील होऊ शकतो, जिथे पाय ओढला जात नाही आणि तुम्हाला काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते. हे व्यासपीठ केवळ राजकारणच नव्हे, तर अराजकीयही असू शकते. आम्ही २२ हजार विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रायोजित केले आहे.” (sonu sood shares views on kangana ranaut getting padma shri and not him supports farmers)

शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनावर सोनू म्हणाला की, ‘मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. त्यांच्यामुळे आपण अन्न खातो.” शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून सोनू त्यांच्या समर्थनात आहे. सरकारच्या विरोधात तो कधीच काही बोलला नसला, तरी याशिवाय त्याने आपली बहीण मालविकाला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले आहे. आपली बहीण राजकारणात येऊ शकते, असे सांगून सोनू सूद म्हणाला की, “आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष चांगले पक्ष आहेत.”

‘ती परीक्षेची वेळ होती’
काही दिवसांपूर्वीपूर्वी सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा (आयटी) छापा पडला होता. त्यावर आता तो आपल्या प्रतिक्रियेत म्हणाला की, “हा परीक्षेचा काळ होता. त्यामुळे माझ्या लोकांसाठी केलेल्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. भविष्यातही आम्ही रुग्णांसाठी मोफत डायलिसिस करत राहू.” त्याच्यावर पैशांच्या घोटाळ्याचा आरोप होता. या दरम्यान अभिनेत्याने आयटीच्या तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले आणि स्वतःला योग्य असल्याचे सिद्ध केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

हे देखील वाचा