Friday, July 5, 2024

मुलाला जन्म दिल्यानंतर नुसरत जहाँ सोशल मीडियावर पुन्हा ऍक्टिव्ह; पाहा कोणता फोटो केलाय शेअर

टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ मागील काही दिवसांपूर्वीच एका मुलाची आई झाली आहे. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत आहे. मुलाच्या जन्मानंतर नुसरतला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर घरी परतल्यानंतर नुसरत पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. याचदरम्यान नुसरतने स्वतःचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरं तर, नुसरतने इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो तिच्या मुलाच्या जन्मापूर्वीचा आहे. या फोटोत नुसरत खूप सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर चाहते तिच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय नुसरतने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ग्रीटिंग कार्डही शेअर केले आहे, ज्यामध्ये ती आई झाल्यामुळे तिचे अभिनंदन केले आहे. (Actress Nusrat is active on social media again, fans eager to see a glimpse of the baby)

मुलाचे नाव ठेवले ‘ईशान’
अभिनेत्री नुसरतने आपल्या मुलाचे नाव ‘ईशान’ ठेवले आहे आणि इंग्रजीमध्ये ते ‘Yishaan’ म्हणून ओळखले जाईल. या नावावरून चाहते आणि टीकाकारांनी असा अंदाज बांधला की, हे मूल अभिनेता यश दासगुप्ताचे आहे. खरं तर, यामागचे मुख्य कारण म्हणजे मुलाचे नाव यशशी जुळत आहे. इतकेच नव्हे, तर वृत्तांनुसार अशी माहिती मिळाली होती की, यश देखील रुग्णालयात नुसरतसोबत संपूर्ण वेळ उपस्थित होता. मुलाच्या जन्मानंतर त्यानेच सर्वात अगोदर सांगितले की, नुसरत आणि बाळ पूर्णपणे निरोगी आहेत.

बेबी बंपसह फोटो झाले व्हायरल
अलीकडेच तृणमूल खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती गर्भवती दिसत होती. मात्र, तिचा विभक्त पती निखिल जैन म्हणाला की, हे मूल त्याचे नाही. कारण तो बराच काळ नुसरतसोबत राहत नाही. काही दिवसांपूर्वीच नुसरतने अधिकृत माहिती दिली होती की, ती निखिल जैनपासून वेगळी होणार आहे. त्याचबरोबर नुसरत पुढे म्हणाली की, त्यांच्या लग्नाला भारतात मान्यता नाही.

नुसरत तिच्या पतीपासून विभक्त
अभिनेत्री नुसरत जहाँ आणि बिझनेसमन निखिल जैन यांचे लग्न हे २०१९ मध्ये झाले. त्यांचे लग्न हे सर्वात चर्चित लग्नांपैकी एक होते. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्याअगोदर दोघांनी ही एकमेकांना डेट केले होते. त्यांचे लग्न तुर्कीमध्ये झाले होते. या लग्नाला फक्त कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. मात्र, गेल्या वर्षापासून नुसरतचे नाव बंगाली अभिनेता आणि भाजप नेता यश दासगुप्ता याच्याशी जोडले गेले आहे, पण दोघांनीही हे नाते अद्याप मान्य केलेले नाही.

एक्स पती निखिलनेही केले अभिनंदन
नुसरत आई झाल्यानंतर तिचा पूर्वाश्रमीचा पती निखिलनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली. तो एका मुलाखतीत म्हणाला की, “मी त्याला चांगल्या आयुष्याची शुभेच्छा देतो. देव करो आणि मुलाला त्याच्या आयुष्यात खूप आनंद मिळो. मी आणि तिच्यातील मतभेद हे मला बाळाच्या जन्माबद्दल अभिनंदन करण्यापासून थांबवू शकत नाहीत. ती आनंदी, बाळ निरोगी आणि भविष्य खूप उज्ज्वल व्हावे अशी माझी इच्छा आहे.” अशाप्रकारे त्याने नुसरतचे अभिनंदन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

हे देखील वाचा