Wednesday, June 25, 2025
Home कॅलेंडर हेराफेरीतील देवीप्रसादची नात आता दिसतेय अशी, सिनेमाक्षेत्राला बाय बाय करुन आता करतेय ‘हे’ काम

हेराफेरीतील देवीप्रसादची नात आता दिसतेय अशी, सिनेमाक्षेत्राला बाय बाय करुन आता करतेय ‘हे’ काम

बॉलीवूडमध्ये काही विनोदी चित्रपट असे आहेत, ज्यांच्यावर नवीन चित्रपटाचा काहीच परिणाम झाला नाही. आज सुद्धा त्या चित्रपटांना बघणे तेवढेच आवडीचे वाटते जेवढे ते चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वेळी वाटत होते. असाच एक सुपरहिट विनोदी चित्रपट म्हणजे हेराफेरी. जो प्रदर्शित होऊन २० वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. परंतु दर्शकांना आज देखील या चित्रपटाचा प्रत्येक सीन लक्षात आहे. या चित्रपटात अक्षय कुमार ,तब्बू ,सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

खरंतर चित्रपटामध्ये अजून एक महत्त्वाचा रोल होता, तो म्हणजे देवीप्रसादची नात रिंकुचा. जीचे अपहरण केले होते. चला तर जाणून घेऊया देवीप्रसादच्या नातीची भूमिका करणारी अभिनेत्री अलेक्सियाबद्दल.

हेराफेरीच्या कहानीमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो,‌ जेव्हा देवीप्रसादची नात रिंकूचे कबिरा अपहरण करतो आणि तो तिला सोडवण्यासाठी रक्कम मागण्यासाठी देवीप्रसादला फोन करतो. परंतु तो फोन चुकुन बाबुरावच्या गॅरेजमध्ये लागतो‌ आणि मग सुरू होते हेराफेरी .या चित्रपटामध्ये रिंकुचे पात्र निभावणाऱ्या मुलीचे नाव अलेक्सीया एनरा आहे. जी आता खूप मोठी झाली आहे .

एलेक्सिया एक उद्योजक आणि एनवायरमेंटल कंसल्टेंट बनली आहे. या चित्रपटामध्ये एक सुंदर मुलगी होती, जी आत्ता खूप हॉट आणि ग्लॅमरस झालेली आहे. तिच्या‌ या लूक बाबतीत सोशल मीडियावर खूप चर्चा चालू असते. एलिक्सीया ही तीन वर्षांची असल्यापासून मॉडेलिंग करत आहे.

एलेक्सीयाच्या आई-वडिलांना तिने चित्रपटात काम करणे अजिबात आवडत नव्हते. ते जाहिराती करण्यासाठी तयार होते. परंतु चित्रपट खूप मोठे असतात आणि त्यांना तयार व्हायला खूप वेळ लागतो, असे तिच्या आई वडिलांचे मत होते. एलेक्सीयाने सांगितले होते की, हेराफेरी हा चित्रपट करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी यामुळे परवानगी दिली कारण, चित्रपटाची शूटिंग उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होती. याच्यानंतर तिला अजुन दुसऱ्या कोणत्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली‌ नाही.

एलेक्सीयाने ‘अववाई षणमुगी’ या चित्रपटात कमल हसन सोबत काम केले आहे. या व्यतिरिक्त तीने १९९८ मध्ये आलेला ‘ऐन थाईन मनिकोडी’ या चित्रपटात देखील काम केले आहे. आता ती चित्रपट सृष्टीपासून लांब आहेत. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. तिची कमल हसनची मुलगी अक्षरा हसनसोबत खूप चांगली मैत्री आहे. त्यांनी बिबीएमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. याच्या व्यतिरिक्त तीने एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये देखील काम केले आहे.

हे देखील वाचा