Monday, March 4, 2024

संगिताच्या दुनियेत पदार्पण करणार परिणीती! लाइव मंचावर घेऊन जाणार संगीताची आवड

परिणीती चोप्रा बाॅलिवूड इंडस्ट्रीमधली लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक आहे. ती नेहमीच चर्चेत असते . मध्यंतरी तिच्या लग्नामुळे ती चर्चेत होती,सप्टेंबरमध्ये शाहीपद्धतीने परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता तिचा एक चित्रपट लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. परिणीतीचे तिच्या अभिनयामुळे चाहत्यांकडुन नेहमीच कौतुक होत असते. ती फक्त तिच्या अभिनयामुळेच प्रसिद्ध नाही तर तिने तिच्या चित्रपटातील अनेक गाण्यांनाही आवाज देवून स्वतःच्या गायन प्रतिभेचं प्रदर्शन केलं आहे. नुकतेच तिच्या जिवनासंबंधी एक अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री तिच्या गायन कलेला पुढे घेऊन जाण्यासाठी तयार आहे.

संगीताच्या दुनियेत पाऊल ठेवणार परिणीती
परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) संगीताच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. रिपोर्टसनुसार, अभिनेत्री एंटरटेनमेंट कंसल्टंट एलएलपी सोबत साइन अप केले आहे. या साइन अपमधुन सिंगिंगबद्दलच्या तिच्या आवडीला ती लाइव मंचावर घेऊन जायला तयार आहे. सांगितलं जातंय की, ही टीम वेंचर्स प्रायवेट लिमिटेड आणि टीएम टॅलेंट मॅनेजमेंटचा( TM talent management) एक भाग आहे. जे देशातील प्रसिद्ध संगीतकारांचे प्रतिनिधीत्व करतात. यात अरिजीत सिंग, सुनिधी चौहान, बादशाह, अमित त्रिवेदी यांच्यासोबतंच 25 पेक्षा जास्त कलाकारांच्या नावाचा यात समावेश आहे.

परिणीतीचे वर्कफ्रंट
परिणीती च्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर ती याआधी अमिताभ बच्चन(Amitabh bachchan), अनुपम खेर आणि बोमन ईरानी यांच्यासोबत ‘ऊंचाई ‘(Unchai) या चित्रपटात दिसली होती. याव्यतिरीक्त ‘मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यु ‘मध्ये परिणीती अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसली होती. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं तर, ती ‘ अमर सिंह चमकीला ‘मध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबच्या एका प्रसिद्ध गायकाच्या जीवनावर आधारित आहे.

हे देखील वाचा