Saturday, June 29, 2024

परिणीती चोप्रा हिची साेशल मीडियावर हवा, बिकीनी लूकने चाहत्यांना घातली भुरळ

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘ऊंचाई’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका यांसारख्या दिग्गज कलाकारा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘ऊंचाई’ हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. मात्र, त्याआधी परिणीती व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत असून चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra) तिच्या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ” ऊंचाई हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास चित्रपट असणार आहे. अनेक वर्षांपासून काम करण्याचा अनुभव असलेल्या अशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला या चित्रपटात मिळाली आहे. अशा दिग्गज कलाकारांकडून मला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळाले.” परिणीती तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिचे दोन सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या बिकिनीतील तिचे दोन सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. दोन्ही फोटोंमध्ये अभिनेत्री हसताना खूप गोंडस दिसत आहे.

परिणीती चोप्राच्या या सुंदर फाेटाेंवर चाहते काैतुकाचा वर्षाव करत आहेत. एकाने युजर्सने कमेंट करत लिहिले की, “मी 7 वंडर्स ऐकले होते पण माझ्यासमोर आठवा आहे.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही पृथ्वीवरील सर्वात गोड एंजेल आहे ही एंजेल सारखी गोंडस दिसते.” यासाेबतच अनेक चाहते परिणीतीच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

परिणीतीने यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय परिणीतीने ‘इशकजादे’,’शुद्ध देसी रोमान्स’ या सारखे अनेक दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या दबंग खानला जिवे मारण्याच्याच्या धमकीमुळे एनआयनं दिली वायप्लस सुरक्षा

भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

हे देखील वाचा