Thursday, July 18, 2024

अनुपम खेर यांच्या पुतणीचं लग्न, आई दुलारीनं उघड केलं सिकंदरच्या बालपणीचं ‘हे’ रहस्य

बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी ते सतत आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींसोबतच ते सामाजिक राजकीय मुद्द्यांवरही भाष्य करत असतात. सध्या अनुपम पुतणी वृंदाच्या लग्नात गुंतलेले आहेत. वृंदा ही राजू खेर यांची मुलगी आहे. अनुपम यांनी या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ शेअर केलेत. त्यातलाच एक गंमतीदार व्हीडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

दरम्यान अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर आपली भाची वृंदाच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यासोबतच खेर यांनी आपली आई आणि मुलाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत. यात त्यांच्या आई दुलारी नातवाच्या बालपणीच्या गोष्टी शेअर करताना दिसत आहेत. (Anupam Kher shared family funny video of mother dulari and son sikandar)

अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांची आई सिकंदरला म्हणत आहे, की केस रंगवून घे जेणेकरून तू म्हातारा दिसणार नाहीस. सोबतच त्या जमलेल्या लोकांना सांगत आहेत, की “लहानपणी सिकंदरचं वजन खूप जास्त होतं. कारण तो भूक नसतानाही खात रहायचा. अगदी एका वेळी १० अंडीही तो फस्त करायचा.” ही गोष्ट ऐकताच सगळे लोक हसायला लागतात आणि सिकंदरची मनसोक्त मजाही घेतात.

यापूर्वीही वृंदाच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र हा एक व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अनुपम यांनी लिहीलं आहे, “कळालंच नाही, वृंदा इतकी मोठी कधी झाली… म्हटलं जातं, की मुली लग्नानंतर परक्या होऊन जातात मात्र आम्ही मानतो की तिचं केवळ घर शिफ्ट झालं आहे. मुंबईहून दिल्लीला. आता तिची दोन कुटुंबं आहेत. तिचं सुखदु:ख वाटून घेणारे आता खूप लोक असतील. आनंदी रहा! खूप आशिर्वाद!”

या सर्व फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे. सोबतच चाहते वृंदाला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा