Wednesday, March 11, 2026
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रीला व्हायचं आहे शमीची दूसरी बायको; खुल्लमखुल्ला केले लग्नासाठी प्रपोज

‘या’ अभिनेत्रीला व्हायचं आहे शमीची दूसरी बायको; खुल्लमखुल्ला केले लग्नासाठी प्रपोज

मोहम्मद शमी हा ‘आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023’ मधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 16 बळी घेतले आहेत. शमीची गोलंदाजी सर्वोत्तम ठरली आहे. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध त्याने पाच षटकांत 18 धावा देऊन 5 बळी घेतले. तेव्हा आख्खा जगाला त्याचे वेड लागले होते. शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट फॉर्म हे भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. त्यानंतर संपूर्ण विश्वच त्याच्यावर फिदा झाले. यामध्ये एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने शमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.

या विश्वचषकात मोहम्मद शमीने आतापर्यंत जे काही यश मिळवले आहे, त्याच दरम्यान अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) शमीला लग्नासाठी प्रपोज केले आहे. पायल याआधीही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी पायलने मोहम्मद शमीला संपूर्ण जगासमोर लग्नासाठी प्रपोज केले आहे. तिने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘शमी, तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.’

हे ट्विट इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. अभिनेत्रीने सर्वांनसमोर शमीची दुसरी पत्नी बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पायलच्या लग्नाच्या प्रस्तावावर शमीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. येत्या काही दिवसांत तो यावर काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पायल घोष ही एका बंगाली कुटुंबातील आहे. तिचा जन्म 1992 मध्ये कोलकाता येथे झाला. तिने सेंट पॉल मिशन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाची आवड निर्माण केली आणि घरातून पळून मुंबईत आली. पायलने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पायल सोशल मीडियावर सक्रिय असते. (Actress Payal Ghosh proposed to Mohammed Shami)

आधिक वाचा-
Shocking! कॉस्मेटिक सर्जरी करणं जीवावर बेतलं, लोकप्रिय अभिनेत्रीने 29व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आर्ची एकच नंबर…रिंकू राजगुरूच्या साडीतील अदांनी तरुण घायाळ

हे देखील वाचा