टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये अभी आणि प्रज्ञा यांच्या मुलींची कथा दाखवली जात आहे. यामध्ये दिसणारी अभिनेत्री पुजा बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. यामुळे अभिनेत्रीने ‘कुमकुम भाग्य’ला अलविदा केला आहे. काही वेळापूर्वीच तिने आपण गरोदर असल्याचा खुलासा केला होता. या मालिकेच्या सेटवरील तिच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे काही फोटो शेअर करत तिने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सेटवर शोच्या टीमने पुजासाठी सरप्राईज फेअरवेल पार्टीची योजना आखली होती. ज्याचे फोटो पुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या ‘कुमकुम भाग्य’ टीमचे आभार मानणाऱ्या भावनिक नोटसह सरप्राईज फेअरवेल पार्टीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या गरोदरपणात मिळालेल्या विशेष प्रेमाबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

पुजाने लिहिली आहे ‘ही’ गोष्ट
या प्रेमळ नोटमध्ये पुजाने लिहिले की, “पुन्हा भेटेपर्यंत संपूर्ण टीमचे आभार… सेटवर माझ्या संपूर्ण गरोदरपणात मला खूप खास आणि छान वाटले त्याबद्दल मी संपूर्ण टीमची नेहमीच ऋणी राहील. रवीजी पासून संजय पर्यंत सर्व युनिट मेंबर्स, कॅमेरा डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट आणि मी सुरक्षित राहण्याची काळजी घेतलेल्या माझ्या सर्व कलाकारांचे आभार. सपोर्ट करणारे आणि काळजी घेणारे, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते. ही एक संस्थान आहे जिथे मला वाटते की, महिला खरोखरच सक्षम आहेत आणि असे काहीही नाही जे त्या करू शकत नाहीत.”
गर्भधारणेदरम्यान केले काम
पुजाने तिच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान शोमध्ये काम केले. ती सतत तिच्या शोचे शूटिंग करत होती. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात पुजाने शोला निरोप दिला आहे. अभिनेत्रीची डिलिवरी डेट मार्चमध्ये आहे. लवकरच तिच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे

‘या’ अभिनेत्रीने पुजापूर्वी सोडला होता शो
पुजा बॅनर्जीपूर्वी एका अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमुळे ‘कुमकुम भाग्य’ शो सोडला होता. अभिनेत्री शिखा सिंगने प्रेग्नेंसीमुळे शोला अलविदा केला होता आणि आजपर्यंत ती शोमध्ये परतली नाही.
हेही वाचा –