कोणत्याही प्रकारचे व्यसन त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मोठे अडथळे निर्माण करत असते. अशात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना दारूचे व्यसन असते. यामुळे अनेकांचे चांगले आयुष्य देखील उध्वस्त होते. अशात बॉलिवूडचे दिग्गज निर्माते महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट देखील व्यसनाच्या खूप आहारी गेली होती.
पूजाने अभिनयामध्ये स्वतःचे पाय रोवले होते, पण चित्रपटांपेक्षा ती तिच्या व्यसनामुळे चर्चेत असायची. तिला व्यसन सोडताना खूप त्रास झाला. व्यसन करत असल्याने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये देखील खूप अडथळे येत होते. परंतु तिने हार न मानता व्यसन सोडले. आता ५ वर्ष झाले ती व्यसनमुक्त आहे. (Actress Pooja Bhatt pens down her emotional on leaving alcohol 5 years back
व्यसनमुक्त झाल्याच्या आनंदात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये स्वतःच्या मनातील भावना मांडल्या आहेत. ती म्हणाली की, “ही अशी एक गोष्ट आहे जिने मला प्रत्येक वादळापासून वाचवले. माझ्या वाईट काळात मला साथ दिली आणि प्रसिद्धीमध्ये मला संयमी राहायला शिकवले.”
पुढे स्वतः विषयी तिने लिहिले की, “मला माहित आहे माझी सगळ्यात मोठी गरज मीच आहे. तसेच माझे मानसिक स्वास्थ माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.” एकूण ५ वर्ष पूजाने अजिबात व्यसन न केल्याने ती खूप खुश आहे.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अशात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करते. काही दिवसांपूर्वी देखील तिने अशीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये पूजाने लिहिले होते की, “आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टीचे आपण मालक आहोत असे आपल्याला वाटते पण, वास्तविक पाहता तसे नसते. या सर्व गोष्टी, तर आपल्या आयुष्यात येत जात असतात. इतकंच नाही, तर आपणही येत जात असतो. आपली खास अशी ओळख, तरी काय आहे.”
आयुष्यावर आधारित अशा गोष्टींविषयी तिचे विचार आणि तिच्या पोस्ट वाचणे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
-बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम










