Friday, July 5, 2024

‘सावंत साडीत सुंदर दिसतेस हा’, पूजा सावंतच्या साडीतील फोटोवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत होय. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचा अभिनय‌ आणि नृत्य पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. पूजाचे चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. अशातच तिचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

पूजाने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने फिकट पिवळ्या रंगाची साडी आणि यावर गडद पिवळ्या रंगाचा सुंदर असा ब्लाऊज घातला आहे. तसेच कानात मोठे ईअरिंग आणि हातात सुंदर अशी पर्स घेतली आहे. तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress pooja sawant share her beautiful photos on social media)

तिच्या चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “बहोत प्यारी लग रही हो,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंट केली आहे की, “सावंत साडीत खूप सुंदर दिसतेस हा.” तसेच बरेच चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मागील काही दिवसापूर्वी तिने कोकणातील बीचवरील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. तिच्या या फोटोंना देखील चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्ससाठीही खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एकदा पिवळ्या रंगाची साडी घाला, ऋतुराज भाऊ…’, सायली संजीवच्या साडीतील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

-‘तुरू तुरू चालू नको’, म्हणत शालूने शेअर केला तिचा अफलातून व्हिडिओ, तिच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

-डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा

हे देखील वाचा