डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा

मिथिला पालकर हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. पारंपारिक लूकपासून ते अगदी बोल्ड लूकपर्यंत ती प्रेक्षकांना तिचा जलवा दाखवत असते. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मागील काही दिवसांपासून मिथिला सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक बोल्ड फोटोशूट ती सोशल मीडियावर करत असते. अशातच तिचे नवीन फोटोशूट समोर आले आहे.

मिथिलाने अलीकडेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पिस्ता कलरचा डीपनेक एक सुंदर ड्रेस घातला आहे. तसेच गळ्यात एक चेन घातली आहे. तसेच तिचे केस मोकळे सोडले आहे. मिथिलाच्या सौंदर्यातील अत्यंत आकर्षित करणारी गोष्ट म्हणजेच तिचे दाट कुरळे केस. या कुरळ्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसते. या फोटोमध्ये देखील तिचे सौंदर्य खुलले आहे. (Actress mithila palkatr share her photos on social media)

तिच्या चाहत्यांना तिचा लूक खूप आवडला आहे. काहींना तिचा हा ड्रेस खूप आवडला आहे, तर काहींना तिची गोड स्माईल खूप आवडली आहे. अशाप्रकारे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोला तीन लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…स्वप्नात तरी करशील का गं लग्न’, ऋतुजा बागवेच्या फोटोवरील कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

-‘गोल्डन परी’, संस्कृती बालगुडेच्या सोनेरी रंगाच्या साडीतील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक

Latest Post