Saturday, April 19, 2025
Home मराठी पूजा सावंतने थेट स्वामी समर्थांना लिहिले पत्र; मागितली ही खास गोष्ट

पूजा सावंतने थेट स्वामी समर्थांना लिहिले पत्र; मागितली ही खास गोष्ट

अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील पूजा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियाचे चांगलेच लक्ष वेधून घेतलेले आहे. आता हा व्हिडिओ नक्की काय आहे?हे आपण जाणून घेणार आहोत.

पूजा सावंतने तिच्या अधिकृत instagram पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये पूजा एक पत्र लिहिताना दिसत आहे. हे पत्र तिने श्री स्वामी समर्थ महाराजांना उद्देशून लिहिले आहे. पण तिने आता या पत्रात तिने काय लिहिलं आहे? हे आपण जाणून घेऊया. हे पत्र लिहिताना अभिनेत्री म्हणताना दिसत आहे की, “प्रिय स्वामी परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. देवाकडे फेसबुक नाही, instagram नाही पण स्वतःचा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर. खरच किती दिवस झाले ना कोणाला पत्र लिहून. म्हणून आज मी थेट तुम्हालाच पत्र लिहिते. आज मी माझ्यासाठी काहीही मागणार नाही. पण तुमच्या दत्त अवतारातील पायाशी जे चौघे उभे आहेत ना मी त्यांच्यासाठी मागणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

पूजाने पुढे लिहिले आहे की, “स्वामी या जगात कुठलाही मुका प्राणी जेव्हा संकटात असेल, तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव म्हणून त्यांच्या मदतीला जाईल. आणि मोठ्या प्राण्याला मदत करी. ही बुद्धी जगातील सगळ्यांना द्या. हीच माझी विनंती आहे. तसेच मला इतकी सक्षम बनवा की, मी या भूतदयेच्या कामात कमी कमी पडणार नाही. बाकी सगळं ठीक आहे. पण सध्या माझा पत्ता बदलला आहे. पण मी जगाच्या कुठल्याही भागात असले, तरीही मन मोकळे करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडलाय. स्वामी लक्ष असू द्या. तुमचीच पूजा मुक्काम पोस्ट देवाचं घर, श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.”

अशाप्रकारे पूजाने स्वामी समर्थांना पत्र लिहून मुक्या जनावरांसाठी प्रार्थना केलेली आहे. सध्या तिचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आणि अनेक जण तिच्या या विचाराचे खूप कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सायली संजीवचे स्विमिंग पुलमधील फोटो व्हायरल; हॉटनेसने चाहत्यांना पडली भुरळ
‘पुष्पा 2’च्या प्रीमियरवरून झालेला गोंधळ दिल्लीपर्यंत पोहोचला, मानवाधिकार आयोगाने पोलिसांकडून मागितले उत्तर

हे देखील वाचा