Monday, July 8, 2024

महाराष्ट्राच्या नयनरम्य निसर्गात स्वतःचा शोध घेणाऱ्या पूजा सावंतने शेअर केले तिच्या ट्रिपचे आकर्षक फोटो

कलाकरांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकांतून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा कलाकार बाहेर पडतात आणि सुट्यांचा आनंद घेतात. इतर वेळेस फक्त शूटिंग, शूटिंग आणि शूटिंगमध्ये गुरफटलेल्या कलाकरांना फार कमी वेळा निवांत वेळ मिळतो. मात्र त्यांना जेव्हा असा वेळ मिळतो तेव्हा तो वेळ कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने सत्कारणी लावतात.

याला मराठी कलाकार देखील अपवाद नाही. मराठी कलाकारसुद्धा त्यांना जमेल तसे ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात, आणि हो, त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील करतात. मराठीमधील आणि आघाडीची अभिनेत्री असणारी पूजा सावंत देखील सध्या तिच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. पूजा सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पूजा खूप स्टनिंग दिसत आहे. (Pooja Sawant’s Chikhaldara trip)

सध्या पूजा अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेली आहे. या ट्रिपचे अनेक फोटो पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहे. सध्या पूजा निसर्गाच्या सान्निध्यात तिचा वेळ घालवत आहे. पूजाने शेअर केलेल्या फोटोसोबत तिने लिहिले, “जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणाचा शोध घेतात आणि तुमच्याबद्दलच नवीन काहीतरी शोधता तेव्हाची ही भावना आहे.”

या फोटोंमध्ये पूजाचा अतिशय साधा मात्र तरीही आकर्षक असा तिचा लूक आहे. काळ्या रंगाची ट्राउझर, पांढऱ्या रंगाचा टॉप त्यावर डेनिम जॅकेट, पायात शूज घातलेली पूजा खूपच कुल लूकमध्ये दिसत आहे. पूजाच्या फोटोमागे असणाऱ्या दोन मोठ्या पवनचक्क्या लक्षवेधी ठरत असून तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

पूजा मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय यशस्वी आणि प्रतिभासंपन्न अभिनेत्री आहे. पूजाने एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेत तिच्या करियरची सुरुवात केली. ही सौंदर्यस्पर्धा तिने जिंकली आणि तिच्या करियरचा श्रीगणेशा झाला. ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केले. पूजाने तिच्या अभिनयासोबतच तिच्या बहारदार नृत्याने देखील सर्वांना वेड लावले. फक्त मराठी पुरते मर्यादित न राहता पूजाने ‘जंगली’ सिनेमातून हिंदीमध्ये देखील पदार्पण केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

 

हे देखील वाचा