भोजपुरी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेत्री पूनम दुबे (Poonam Dubey) मंगळवारी (८ फेब्रुवारी) आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तसेच चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनय क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या पूनमचे खरे स्वप्न वेगळेच होते, जाणून घेऊया तिच्याबद्दल खास तिच्याबद्दल खास गोष्टी.
भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबे आपल्या अभिनया प्रमाणेच फिटनेससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. पूनम सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. त्यावरून ती आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या अभिनेत्रीबद्दलचा एक गाजलेला किस्सा म्हणजे, तिने आपल्या आई विरोधातच उपाशी राहून आंदोलन केले होते. नक्की काय होता हा किस्सा जाणून घेऊ.
सध्या भोजपुरी सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या पूनमने दिनेश लाल यादव, खेसारी लाल यादव, पवन सिंग, यश मिश्रासारख्या अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या पूनमने चित्रपटात येण्याचा कधी विचारही केला नव्हता. तिचे पहिले स्वप्नं म्हणजे तिला एयर होस्टेस व्हायचे होते. त्यासाठी तिने आपल्या बारावी पर्यंतच्या शिक्षणानंतर सहा महिन्याचा कोर्स सुद्धा जॉईन केला होता. मात्र याच काळात तिच्या आईची तब्येत बिघडल्याने तिला घरी राहावे लागले. काही दिवसांनी आईची तब्येत ठीक झाल्यानंतर तिने पुन्हा या क्लासला जायला सुरुवात केली. मात्र तिच्या आईला हा निर्णय पसंद नव्हता. त्यामुळे त्यांनी तिला पोलिस आणि शिक्षकाच्या नोकरीसाठी तयारी करण्यास सांगितली. आईच्या याच सल्ल्यावर नाराज झालेल्या पूनमने चक्क उपाशी पोटी राहून आंदोलन केले होते. यावेळी तिने मिस अलाहाबादसाठी अर्ज केला आणि हा किताबसुद्धा मिळवला. ती युपीच्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये सुद्धा समाविष्ट होती.
अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर पूनमने टीव्हीवरील जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. यावेळी ती मालिकेसाठी सुद्धा प्रयत्न करत होती. याच दरम्यान तिची भेट एका चित्रपट निर्मात्याशी झाली त्यांनी पूनमला चित्रपटात घेण्याची तयारी दर्शवली. यानंतर पूनमला अनेक गाण्यांच्या ऑफर यायला लागल्या. तिने ‘जो जीता वही सिकंदर’, ‘हमारा फर्ज’, ‘बाबा रंगीला’, ‘हम है जोडी नंबर वन’सह ३५ चित्रपटात काम केले आहे.
सध्या पूनम दुबे चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमी सक्रिय असते. आपले अनेक व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हेही वाचा-