Thursday, March 28, 2024

लता दीदींच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने केले ‘असे’ काही; संतापलेले युजर्स म्हणाले, ‘जरा तरी लाज वाटू दे’

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारी, २०२२ रोजी एक बातमी कलाविश्वाला धक्का देऊन गेली. ती बातमी म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाची. लता दीदींच्या निधनाच्या बातमीने आख्खा भारत शोकसागरात होता. त्यांच्या निधनाला दोन दिवस उलटले असूनही चाहते अद्याप खचले आहेत. मात्र, अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्या व्हिडिओमुळे ती खूप वाईट पद्धतीने ट्रोल झाली.

झालं असं की, दीर्घ आजारानंतर वयाच्या ९२ व्या वर्षी लता दीदींनी (Lata Mangeshkar) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. यानंतर चाहत्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत होते. मात्र, दुसरीकडे लता दीदींच्या निधनानंतर अंकिताने (Ankita Lokhande) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ लता दीदींना श्रद्धांजली देण्यासाठी तर अजिबातच नव्हता. खरं तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती आपला पती विकी जैनसोबत (Vicky Jain) एन्जॉय करताना दिसत होती.

अभिनेत्रीन शेअर केलेल्या या व्हिडिओत ती आपल्या पतीसोबत कारमध्ये दिसत होती. इतकेच नाही, तर ती या व्हिडिओत पंजाबी गायक हार्डी संधूच्या (Hardy Sandhu) ‘बिजली बिजली’ या गाण्यावर डान्सही करत होती. अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच, युजर्सनी नाराजी व्यक्त करत तिला जोरदार ट्रोल केले.

अंकिताला ट्रोल करत युजर्सनी तिला लता दीदींच्या निधनाची आठवण करून दिली. यावेळी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “जरा तरी शोक व्यक्त करा मॅडम, हे सर्व उद्याही करू शकता.” त्याचबरोबर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “लता दीदी आता आपल्यात नाहीत, हे तुला माहिती नाही का अंकिता?”

आणखी एका युजरने म्हटले की, “जरा तरी लाज वाटू दे, एकीकडं संपूर्ण देश लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे, आणि दुसरीकडं तू स्वत: इंडस्ट्रीचा भाग असताना नाचत- गाणी म्हणत व्हिडिओ पोस्ट करत आहेस.”

यानंतर लगेच अंकिताने लता दीदींना श्रद्धांजली देत पोस्ट शेअर केली.

अंकिताने लता दीदींचा फोटो शेअर करत लिहिले की, “कदाचित या जन्मात भेट होवो ना होवो, तुमच्या आत्म्याला शांती मिळो.”

हेही पाहा- आरआरआर सिनेमातील Ajay Devgan आणि Alia Bhattच्या मानधनात तयार होऊ शकतो Bollywoodचा आख्खा एक चित्रपट?

लता दीदींचं रविवारी (६ फेब्रुवारी) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे राजकीय सन्मानासोबत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा-

हे देखील वाचा