Wednesday, July 3, 2024

‘माझी काळजी नसावी, मी काळजी घेतेय..’अभिनेत्री प्राजक्ता माळीची ती पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या तिच्या रानबाजार हा वेबसिरीजमुळे सर्वत्र चर्चेत आली आहे. रानबाजारमधील प्राजक्ताचा बोल्ड लूक आणि दमदार अभिनयाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या ही वेबसिरीज चांगलीच गाजत आहे. याआधी प्राजक्ता चंद्रमुखी चित्रपटातही दिसून आली होती. यामध्ये तिच्या तडफदार लावणीने सर्वांनाच घायाळ केले होते. या सगळ्या व्यक्त कार्यक्रमातून वेळ काढत प्राजक्ता सुट्टीची मजा घेताना दिसत आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या प्राजक्ताच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसत होती. परंतु काही काळासाठी प्राजक्ताने या कार्यक्रमातून सुट्टी घेतली आहे.   अभिनयाइतकीच प्राजक्ता सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंवरुन ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या तिची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सोलो ट्रिपवर गेल्याचे दिसत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन प्राजक्ताने ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये  प्राजक्ता आपल्या सोलो ट्रिपची मजा घेताना दिसत आहे. या फोटोसोबत प्राजक्ताने “माझी पहिली अधिकृत सोलो ट्रिप देवभूमी- हिमाचल प्रदेश हास्यजत्रेला मिळालेल्या सूट्टीचा यथायोग्य वापर,काळजी नसावी,जत्रेत लवकरच परत येऊ.आणि माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय,” असा कॅप्शन तिने दिला आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने जुळून येती रेशीमगाठी,  महाराष्ट्राची हास्यजत्रा, पावनखिंड अशा अनेक गाजलेले चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा