Sunday, April 14, 2024

अभिनेत्री, लेखिका, निर्माती झाल्यानंतर आता ‘या’ क्षेत्रात नशीब आजमावणार ट्विंकल खन्ना, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आपल्या अभिनय कारकिर्दित फारशी कमाल करु शकली नसली तरी ती एक प्रतिभावान लेखिका म्हणून चांगलीच लोकप्रिय आहे. एक प्रतिभावान लेखिका, अभिनेत्री असण्यासोबतच ट्विंकल खन्ना एक चित्रपट निर्माती आणि डिजायनरही आहे.त्यामुळेच तिला अनेक कला अवगत आहेत असच म्हणाव लागेल. परंतु आता ट्वंकलने पुन्हा एकदा आणखी एक कला अवगत केली आहे. आता कोणत्या नव्या क्षेत्रात ट्विंकलने प्रवेश केला आहे, चला जाणून घेऊया. 

आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने 90 च्या दशकात अभिनेत्री ट्विंकल खन्नाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. परंतु अभिनयात तिला फारसे यश मिळू शकले नाही. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी ती नेहमीच अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्विंकल गिटार वाजवत असल्याचे दिसत आहे. आपली ही नवीन कला तिने तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये ट्विंकल शाहरुख खानच्या जादू तेरी नजर या गाण्याचे सुर वाजवताना दिसत आहे.

या व्हिडिओसोबत ट्विंकलने नवीन कला शिकण्यासाठी वयाचे बंधन कधीही नसते. त्यामुळेच मी गिटार शिकण्याचा निर्णय घेतला आहे. मी ठरवलं तर मी यामध्येही पारंंगत होईन. असा कॅप्शन दिला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ‘पॅडमॅन’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करताना ट्विंकल खन्नाने तिच्या करिअरमध्ये ‘दिल तेरा दिवाना’, ‘मेला’, ‘जुल्मी’, ‘इतिहास’ आणि ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ट्विंकलने ‘पायजामा आर फॉरगिव्हिंग’, ‘द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘मिसेस फनीबोन्स’ यासह अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. काही वेळापूर्वी ट्विंकलने तिच्या ‘द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकातून ‘सलाम नोनी आप्पा’ या लघुकथेवर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती.(twinkle khanna share video of her playing shahrukh khan song on guitar)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमृता खानविलकरने दिल्या हटके पाेज, पाहा फाेटाे गॅलरी

जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

हे देखील वाचा