Sunday, June 4, 2023

प्राजक्ता माळीने केला तिच्या ब्रेकचा खुलासा म्हणाली, ‘त्यावेळी मला काहीही कळत नव्हते’

उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajkta mali) होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. नुकतेच तिने एक शॉकिंग न्यूज दिली आहे.

लवकरच प्राजक्ता ‘वाय’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले की, वाय या चित्रपटाचे शूटिंग करताना माझे ब्रेकअप झाले होते. मी कुठे होते, काय करत होते हे देखील मला आठवत नव्हते. हा चित्रपट जेव्हा शूट करत होते, तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक मला आठवण करून देत होते की, तू हा सीन करताना पडली होती आणि तू या सीनला असं करत होती. त्यावेळी मी फक्त हो असं म्हणत होते.”अशाप्रकारे तिने तिचा ब्रेकअपचा अनुभव सांगितला आहे.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. नुकतेच तिची ‘रानबाजार’ ही वेबसिरीज देखील प्रदर्शित झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा