Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी प्रेग्नंट…,’ अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने उघडे केले मोठे गुपित; म्हणाली, ‘मध्यंतरी एक…’

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे होय. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियार शेअर करत असते. प्रार्थनाने नुकताच युटुब चॅनेल सूरू केले आहे. सध्या प्रार्थनाना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील अफवा मोडून काढल्या आहेत.

नुकतेच तिने तिच्या युटुब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्याबद्दल काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. व्हिडिओमध्ये, प्रार्थनाला (Prarthana Behere) विचारण्यात आले की तिने स्वतःबद्दल कोणती अफवा ऐकली आहे. त्यावर ती म्हणाली, “मध्यंतरी मी प्रेग्नंट आहे आणि म्हणून मी काम करायचं बंद केलं आहे असं लोकांना वाटलं होतं. त्याच दिवसांमध्ये मी एक पोलका डॉट असलेल्या एका ड्रेसमधला फोटो पोस्ट केला होता आणि तेव्हा सगळे असे म्हणाले की जेव्हा अभिनेत्री पोलका डॉट घालते तेव्हा ती प्रेग्नंट असते. त्यामुळे मीही प्रेग्नंट आहे आणि ही अफवा मी ऐकलेली.”

प्रार्थनाने स्पष्ट केले की ती अजूनही अविवाहित आहे आणि तिला लग्नाची कोणतीही घाई नाही. तिने तिच्या चाहत्यांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. प्रार्थनाच्या चाहत्यांनी तिच्या स्पष्टतेसाठी तिचे कौतुक केले आहे. त्यांनी तिला तिच्या करिअरमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकदा अफवा पसरवल्या जातात ज्याचा उद्देश व्यक्तीचा छळ करणे असतो. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे असे प्रार्थना म्हणाली.


प्रार्थनाने तिच्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून केली. या मालिकेत तिने ‘वैशाली’ ही भूमिका साकारली आणि ती प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेनंतर प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. त्यापैकी ‘मितावा’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या चित्रपट आणि मालिका विशेष गाजल्या. प्रार्थनाने तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. (Actress Prarthana Behere revealed a big secret video viral on social media)

आधिक वाचा-
‘फुकरे 3’ची शाहरुखच्या ‘जवान’ला जबरदस्त टक्कर; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
‘खेळकर क्षण…’ म्हणत रोनित रॉयने श्वेतासोबतचा ‘तो’ फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले, ‘वाट…’

हे देखील वाचा