प्रार्थना बेहेरे इतकीच सुंदर आहे तिची बहीण; फोटो पाहून नेटकऱ्यांनीही बांधले कौतुकाचे पूल


‘पवित्र रिश्ता’ या हिंदी टीव्ही मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे होय. त्यात तिने ‘वैशाली’ची भूमिका साकारली होती. ही सहाय्यक भूमिका असूनही तिने या संधीचे सोने केले. तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमाने तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की प्रार्थनाची बहीण देखील तिच्या इतकीच सुंदर आहे.

नुकताच प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थनाची बहीण गायत्रीचे काही फोटो पाहायला मिळाले आहेत. खरं तर अभिनेत्रीने बहिणीच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिचे बहिणीसोबतचे फोटो आहेत. यात त्या दोघींचे लहानपणापासूनचे फोटो पाहायला मिळत आहेत. यात तुम्ही पाहू शकता की, प्रार्थनाची बहीण गायत्री तिच्या इतकीच सुंदर आणि हॉट आहे. नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून तिचे कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत प्रार्थनाने भलंमोठं कॅप्शन लिहिलं आहे. सोबतच तिने तिचे प्रेम व्यक्त करत, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तिने या वाढदिवशी बहिणीसोबत नसल्याची खंत देखील व्यक्त केली आहे. चाहत्यांनी मात्र व्हिडिओवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. (prarthana beheres sister is also beautiful like her see photos)

प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत वैशालीची भूमिका साकारत ती घराघरात पोहचली. पुढे ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याव्यतिरिक्त तिने ‘बॉडीगार्ड,’ ‘वजह तुम हो’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. प्रार्थना आता लवकरच ‘छूमंतर’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकच नंबर! आता जावई- सासरे होणार एकमेकांचे सख्खे शेजारी; नवीन घरासाठी धनुष करणार ‘इतके’ कोटी खर्च

-‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच

-‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.