मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार नेहमीच अभिनयाव्यतिरिक्त देखील त्यांचे विविध छंद जोपासताना बऱ्याचदा दिसतात. कोणाला वाचन आवडते, कोणाला फिरणे आवडते, कोणाला लिखाण आवडते आदी अनेक बाबी आता आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांबद्दल समजतात. अशातच मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेली प्रार्थना बेहेरे देखील आता तिचा जुना छंद पुन्हा एकदा जोपासत आहे. झी मराठीवरील अतिशय गाजलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर प्रार्थना चित्रपट किंवा दुसऱ्या मालिकेमध्ये दिसलीच नाही. त्यामुळे ती सध्या नक्की काय करते असा प्रश्न तिच्या फॅन्सला पडला होता. मात्र आता प्रार्थनाने ती काय करते याचे उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये प्रार्थनाच लूक एकदमच वेगळा असून, ती त्यात खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती भरतनाट्यमच्या लूकमध्ये दिसत आहे. खूप कमी लोकांना माहित असले की ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. लहान असताना तिने भरतनाट्यम या डान्स प्रकारचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. आता १५ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा तिला भरतनाट्यम सादर करण्याची संधी मिळाली आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या सादरीकरणासाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. यात ती भरनाट्यमच्या विविध पोज देखील देताना दिसत आहे.
प्रार्थनाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “१५ वर्षानंतर…तुमच्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी आणि कौतुकाची खूप धन्यवाद” तिच्या या व्हिडिओवर श्रुती मराठे, ऋतुजा बागवे आदी कलाकारांनी देखील कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. प्रार्थना तिच्या या नवीन लूकमध्ये कमालीची सुंदर आणि ग्रेसफुल दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि सोबतच नर्वसनेस देखील स्पष्ट दिसला. सर्वानीच तिचे आणि तिच्या डान्सचे भरभरून कौतुक केले असून, लवकरच तिला पुन्हा टेलिव्हिजनवर परतण्याची विनंती देखील केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबई सोडण्यापूर्वी ऋतिकने पॅपराझींसमाेर साबा आझादला केले किस, व्हिडिओ व्हायरल
‘ड्रामाक्विन’ शिकवणार अभिनय? राखीने अकादमीसाठी उचलले माेठे पाऊल, एकदा व्हिडिओ पाहाच