Friday, July 5, 2024

प्रियांका चोप्राला एका लेस्बियन मुलीने केले होते प्रपोज, अभिनेत्रीने स्वतःला वाचवण्यासाठी लढवलेली ‘ही’ युक्ती

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे, जिने हॉलिवूडमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. आज तिचे देश-विदेशात मोठे नाव बनले आहे. प्रियांका आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये क्वचितच दिसते. पण तिचे चित्रपट कोणीही विसरू शकत नाही. प्रियांकाने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून, तिने आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर प्रियांका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सध्या तिच्याशी संबंधित एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्राच्या एका लेस्बियन मुलीशी झालेल्या संवादाची ही कहाणी आहे. तुम्हाला माहिती आहे का की, प्रियांका चोप्रासमोर एकदा अशी समस्या निर्माण झाली होती, त्यावर तोडगा काढण्यासाठी अभिनेत्रीने दिवसा तारे पाहिले होते. २०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’मध्ये (Coffee with Karan) पोहोचलेल्या प्रियांका चोप्राने तिला एका मुलीने प्रपोज केल्याचे उघड केले होते. अशा परिस्थितीत हा संपूर्ण प्रकार सांगताना प्रियांकाने स्वतःला या परिस्थितीतून कसे बाहेर काढले हे देखील सांगितले.

प्रियांका नेहमीच मीडियासमोर फिल्टरशिवाय बोलताना दिसली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा करणने शोमध्ये पोहोचलेल्या प्रियांका चोप्राला प्रश्न विचारला, तेव्हा अभिनेत्रीने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. यासोबतच अभिनेत्रीने संपूर्ण परिस्थितीचा खुलासाही केला. शोमध्ये जेव्हा करणने प्रियांकाला विचारले की, “तू कधी लेस्बियनशी संवाद साधला आहेस?”

या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांका चोप्रा म्हणाली की, काही वर्षांपूर्वी तिला एका मुलीने मला नाईट क्लबमध्ये प्रपोज केले होते. अशा परिस्थितीत प्रियांकाने मुलीला फसवले, तिने सांगितले की ती त्यावेळी रिलेशनशिपमध्ये होती आणि तिचा एक बॉयफ्रेंड आहे. ही मुलगी प्रियांका आणि करण जोहरची कॉमन फ्रेंड होती. त्या काळात प्रियांका सिंगल असली तरी तिने स्वत:ला वाचवण्यासाठी ही कहाणी सांगितली. प्रियांकाने करण जोहरच्या शोमध्ये सांगितले होते की, “त्यावेळी मला बॉयफ्रेंड नव्हता. पण मला मुलांमध्येच रस आहे.”

प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्‍ये निक जोनाससोबत लग्‍न केले. या जोडप्‍याच्‍या लग्‍नाला आता तीन वर्षे झाली आहेत आणि दोघेही लॉस एंजेलिसमध्‍ये त्यांच्या पॉश निवासस्थानी राहतात. प्रियांका चोप्रा अमेरिकेतही तिच्या इंस्टाग्रामवर भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे पालन करताना दिसते. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास २१ जानेवारी रोजी सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना याबद्दल माहिती दिली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा