×

आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियांका चोप्राला आली वडिलांची आठवण, शेअर केली भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या दमदार अभिनयाने हॉलिवूडमध्ये देखील तिचे मोठे स्थान निर्माण केले आहे. आज प्रियांकाला बॉलिवूडसोबतच हॉलिवूड अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते. प्रियांका नेहमीच या ना त्या कारणामुळे प्रकाशझोतात येत असते. प्रियांका तिच्या कामत व्यस्त असूनही सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर करताना दिसते. ती तिच्या या पोस्टमुळे देखील खूपच चर्चेत असते. नुकतीच प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. जी तिने तिच्या आईवडिलांना उद्देशून लिहिले आहे. प्रियांकाच्या आई आणि वडिलांच्या लग्नाचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियंकाने तिच्या वडिलांची आठवण काढली आहे. प्रियांकाच्या वडिलांचे अशोक चोप्रा यांचे १० जून २०१३ रोजी कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले.

priyanka chopra
Photo Courtesy: Instagram/priyankachopra

प्रियंकाने तिच्या पोस्टमध्ये आई वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला असून, तिने शेअर केलेला फोटो खूपच जास्त बोलका आणि व्यक्त होणारा आहे. या फोटोमध्ये तिचे आई वडील दोघेही फिल्मी अंदाजमध्ये दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, “मला अशा पद्धतीने साजरा केलेला तुमच्या लग्नाचा वाढदिवस कायम लक्षात आहे. तुमची खूप आठवण येत आहे बाबा. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.” ही पोस्ट प्रियंकाने तिच्या आईला देखील टॅग केली आहे.

प्रियांका नेहमीच तिच्या वडिलांना आठवत असते. तिने मागच्यावर्षी तिच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी, तिचे पुस्तक असलेल्या ‘अनफिनिश्ड’मधील एका पानाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो जेव्हा प्रियांका पाच वर्षाची होती तेव्हाचा होता. या फोटोसोबत तिने लिहिले होते की, “माझ्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये माझे बाबा आणि मी आमच्यात खूपच चांगला समजुदारपणा होता. ते जेव्हा जेव्हा आर्मी क्लबमध्ये परफॉर्म करायचे तेव्हा ते आधी माझ्या डोळ्यात पाहायचे.”

Photo Courtesy: Instagram/priyankachopra

याआधी देखील प्रियंकाने तिचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात तिने तिच्या वडिलांची वर्दी घातली होती. प्रियांकाच्या आई वडिलांनी आर्मीमध्ये देशासाठी सेवा दिली होती. या फोटोसोबत तिने लिहिले होते की, “मी माझ्या वडिलांची वर्दी घालत घराच्या आसपास त्यांचे मागे धावणे मला खूप आवडायचे. मी मोठी होऊन त्यांच्यासारखी बनू इच्छित होती. ते माझे आदर्श होते.” नुकतीच प्रियंका एका मुलीची आई झाली असून, तिने सरोगसीचा माध्यमातून मुलीला जन्म दिला आहे. ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शंस’ हा प्रियांकाचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा होता.

हेही वाचा :

Latest Post