Wednesday, July 3, 2024

अभ्यासासाठी लढणाऱ्या मुलींना पाहून प्रियांका चोप्रा झाली भावूक; म्हणाली…

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती उत्तर प्रदेशातील विविध ग्रामीण भागात फिरत आहे आणि तेथील गरिबी, शिक्षण, मानसिक आरोग्य यासह अनेक परिस्थितींचा आढावा घेत आहे. प्रियांका युनिसेफची सदस्यही आहे. गरिबी आणि अपुऱ्या शैक्षणिक संधींशी लढणाऱ्या उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील मुलांनाही ती भेटताना दिसली. प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दोन मुलींच्या अभ्यासातील संघर्ष जाणून भावूक झालेली दिसत आहे. त्या मुलीही आपली परिस्थीती सांगताना भावूक होताना दिसल्या.

प्रियांका चोप्रा (priyanka chopra) हिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली त्यांच्या अभ्यासाच्या हक्कासाठी लढत असल्याचे दिसून येते. एका मुलीने प्रियंका चोप्राला असेही सांगितले की, “तिला लहान वयातच लग्न करायला लावले जात होते, पण ती प्रत्येक अडचणीनवर मात करत लढाई लढत आहे. तिची धडपड ऐकून प्रियंका खूप भावूक झालेली दिसली आणि बोलता बोलता तिला धीर दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, “या दोन मुलींची शिक्षणासाठी आणि कमी वयात लग्न न करणे ही लढाई प्रेरणादायी होती. तिने लिहिले, “मी भेटलेल्या मुलींपैकी एकीलाही त्यांचा अभ्यास सुरू करण्याची संधी मिळाली नाही, कारण त्या फक्त मुली आहेत.”

प्रियंका चोप्राने पुढे लिहिले, “पण त्या मुलीना त्याच्या चिकाटीचे फळ मिळाले आणि वयाच्या 12 आणि 14 व्या वर्षी  किशोरवयीन विकास आणि सक्षमीकरण (एडीई) या युनिसेफ-समर्थित उपक्रमाद्वारे वाचणे आणि लिहायला शिकत आहे. या उपक्रमाद्वारे उत्तर प्रदेश राज्यातील अशा 10 हजार मुलींना त्याचा लाभ मिळत आहे. या दोन्ही मुली शाळेपूर्वी आणि शाळा झाल्यानंतर इतरांच्या घरी काम करून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत, तरीही त्यांचा शिकण्याचा उत्साह अविश्वसनीय आहे.”

प्रियांका चोप्रा लवकरच आलिया भट्ट (alia bhatt) आणि कॅटरिना कैफ (katrina kaif) हिच्यासाेबत एक चित्रपट करणार आहे. (Actress priyanka chopra unicef video as she meet girls who fights for right to education)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलियाची स्टाईल देश-विदेशातही हिट; मॉडेल्सने गंगूबाई लूकमध्ये केलं रॅम्पवॉक
सलमानसोबत ‘या’ भारतीय महिला बॉक्सरने रोमँटिक गाणं केलं रिक्रिएटच; म्हणाली,’स्वप्न पूर्ण…’

हे देखील वाचा