Thursday, February 22, 2024

आलियाची स्टाईल देश-विदेशातही हिट; मॉडेल्सने गंगूबाई लूकमध्ये केलं रॅम्पवॉक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) नुकतीच तिने तिच्या पहिल्या मुलाची जन्म दिला आहे. आई झाल्यापासून ही अभिनेत्री सतत चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग जगभरात आहे. आलिया भट्ट सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलिया भट्टने तिच्या छोट्या पण शानदार चित्रपट कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्रीचे एक पात्र गंगूबाई काठियावाडी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाची क्रेझ देश-विदेशात पाहायला मिळत आहे.

खरं तर, मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्स आलिया भट्टच्या गंगूबाईच्या गेटअपमध्ये रॅम्पवर चालताना दिसल्या. आलियाचा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, प्रत्येकजण केवळ तिचा लूकच नाही तर चित्रपटात केलेल्या तिच्या डान्सची हुक स्टेप देखील कॉपी करताना दिसत आहे. पण तरीही लोकांमध्ये त्याच्या या व्यक्तिरेखेची क्रेझ कमी झालेली नाही. अलीकडेच या अभिनेत्रीचे पात्र सातासमुद्रापार दिसले, ज्यात गंगूबाईसारखा पेहराव मॉडेल्सने केला होता. गंगूबाईसारख्या बांगड्या, टिकली, झुमके, आणि काळा चष्मा या मॉडेल्सने रॅम्पवॉक करताना लावला होता. फक्त गंगूबाईच्या साडीची जागा गाऊनने घेतली.

 

View this post on Instagram

 

फॅशन शोची ही फोटो समोर येताच सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मिस स्टार मलेशिया 2022 ने शोमधील एक फोटो देखील शेअर केला आणि लिहिले,”सन्मानाने जगण्यासाठी कोणाला घाबरू नका”. या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, या वर्षी प्रदर्शित झालेल्या सेक्स वर्कर गंगूबाई काठियावाडीच्या जीवनावर आधारित अभिनेत्रीचा चित्रपट, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यासोबतच या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचेही सर्वांनी कौतुक केले होते. गंगूबाईचा इंडो-वेस्टर्न लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात आलिया भट्टसोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भन्साळींनी सांभाळली आहे. अनेक बिग बजेट सिनेमांना ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाने टक्कर दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनाक्षी सिन्हाचा क्लासी लूक, पाहा फोटो

बहिणीला सासरी पाठवताना अभिनेता झाला भावूक; दीपिकालाही अश्रू अनावर

हे देखील वाचा