Monday, July 1, 2024

‘लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही काय केले होते?’ ऍडल्ट सीनच्या प्रश्नावर रचिता रामने दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड कलाकार अनेकवेळा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. अशातच अभिनेत्री रचिता राम ही सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यात एका घटनेमुळे चर्चेत आहे. तिने एका पत्रकाराच्या प्रश्नाला असे काही उत्तर दिले आहे की, त्याची बोलतीच बंद झाली आहे. एका पत्रकाराने रचिताला विचारले की, लग्नाच्या पहिल्या रात्री तिने काय केले होते.

पत्रकाराने अभिनेत्रीला विचारलेला हा प्रश्न तिने एका चित्रपटात केलेल्या इंटीमेट सीनबद्दल होता. कारण अभिनेत्रीने सुरुवातीला सांगितले होते की, ती असे सीन करणार नाही. ‘लव्ह यू रच्चू’च्या प्रमोशनवेळी तिने तिचे प्रॉमिस तोडून इंटीमेट सीन्स दिल्याबद्दल विचारले. (Actress Rachita ram shuts reporter by giving suitable reply as what did you di on
your first night)

या प्रश्नाचे उत्तर देताना रचिताने सांगितले की, तिने तेच केले जी चित्रपट आणि स्क्रिप्टची डिमांड होती. लव्ह यू रच्चू या चित्रपटातील रचिता आणि अजय रावचा बोल्ड सीन व्हायरल झाला आहे. हा सीन अनेकजण शेअर करत आहे. परंतु जेव्हा अभिनेत्रीला हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र तिला राग अनावर झाला.

तिने रागात पत्रकाराला उलट प्रश्न विचारला की, “येथे खूप लोकं आहेत, ज्यांची लग्न झाली आहेत. मला कोणालाही असे लाज वाटण्यासारखे काही विचारायचे नाही, परंतु मला तुम्ही सांगा साधारणतः लग्नाच्या पहिल्या रात्री लोकं काय करतात.” तिच्या या प्रश्नावर सगळेच एकदम शांत झाले.

यानंतर तिने सांगितले की, “सगळेजण रोमान्स करतात हो ना? चित्रपटात देखील हेच दाखवले आहे.” या आधी देखील अनेकवेळा तिने बोल्ड सीन देण्याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तिने सांगितले होते की, जर तिने प्रॉमिस करून देखील इंटीमेट सीन्स केले आहेत, याचा अर्थ नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल. तिच्या या वक्तव्यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा