Tuesday, June 25, 2024

कुणी येणार गं…! ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री होणार आई, स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिली गुडन्यूज

आई कुठे काय करते‘ फेम आभिनेत्री राधा सागरने अभिनयाच्या जोरावर घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेत तिने आभिषेकच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. अंकिता हे खलनायिकेच पात्र साकारून राधाने प्रेक्षकाच्या मनात विषेश स्थान मिळवले. त्यानंतर ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये दिसली. सध्या राधा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आभिनेत्री राधाचे (Radha Sagar) खऱ्या आयुष्यात लग्न झालेल आहे. हि गोष्ट बऱ्याच लोकांना माहित नाही. राधाच्या नवऱ्याचं नाव सागर कुलकर्णी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे. इतकच नाही तर सध्या सोशल मीडियावर राधीचे बेबी बंपचे फोटो व्हायरल होत आहेत. राधाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. राधा सागरचा जन्म 27 मार्च 1989 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिने हि पोस्ट केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

राधा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून राधाने कामातून ब्रेक घेतला आहे. याच कारण राधा आई होणार आहे. हि गोड बातमी राधाने एक व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. तिचा हा गरोदरपणातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राधाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर पोस्ट शेअर केली आहे. तिने पतीसोबत बेबी बंपचे फोटो शूट केले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा वेस्टन ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये राधा खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहीले की, आमच्या आयुष्यामधील सगळ्यात उत्तम बातमी सांगण्यासाठी हा चांगला दिवस आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊसच पाडला आहे. अनेकांनी राधाच आभिनंदन केल आहे. (Actress Radha Sagar is going to be a mothe)

हे देखील वाचा