Sunday, June 23, 2024

धक्कादायक करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसने थकवले कामगारांचे वेतन, युनियन मिळाला इशारा

प्रत्येक कलाकार काम करत असताना त्याचा काहीतरी मोबदला मिळेल या हेतूने काम करत असतात. पण आलिकडच्या काळात चित्रपटाच्या सेटवर कामगारांना पगार मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक किस्सा समोर आला आहे. निर्माता करण जोहर दिग्दर्शत आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाले आहे. त्यानंतर त्याची धर्मा प्रॉडक्शन कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. ‘सेल्फी‘ चित्रपटात काम करणाऱ्या मजुरांमुळे कंपनीने अद्यापही पगार दिलेला नाही. त्यामुळे सध्या खळबळ माजली आहे.

चित्रपटात काम करणाऱ्या कामगारांनी आता फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि अलाईड मजदूर युनियनकडे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि अलाईड मजदूर युनियनने जारी केलेल्या निवेदनानुसार, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी यासोबत ‘सेल्फी’च्या (Selfiee) शूटिंगदरम्यान सेट उभारणाऱ्या बहुतेक कामगारांना त्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.

मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि सनी देओल स्टार फिल्म ‘बाप’ आणि आदित्य रॉय कपूरचा ‘ओम’ या चित्रपटाचीही तीच आवस्था आहे. या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सेटिंग मजुरांचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत, असा आरोप होत आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांनी भाजप नेते आणि खासदार सनी देओल यांच्याकडेही मदतीचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

युनियनचे अध्यक्ष अशोक दुबे म्हणाले की, फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि अलाईड मजदूर युनियनच्या सेटिंग सदस्यांनी ‘ओम’ चित्रपटासाठी जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंत काम केले. त्याचे निर्माते अहमद खान यांनी अद्याप 21.50 लाख रुपयांहून अधिकची थकबाकी भरलेली नाही. तसेच बाप चित्रपटच्या मजुरांनाही चित्रपटाच्या निर्मात्याची जवळपास तितकीच रक्कम दिलेली नाही.

दरम्यान, सेल्फी चित्रपटात काम करणाऱ्या मजुरांचे सुमारे 13.50 लाख रुपयांचे पेमेंट अद्यापही झालेले नाही. 14 जुलै 2021 रोजी कामगार आयुक्त कार्यालयाने सर्व चित्रपट निर्मात्यांना लेखी सूचना दिल्या होत्या की, मजुरांना चित्रपट निर्मात्यांद्वारे थेट पैसे दिले जातील. परंतु तरीही सर्व निर्माते त्यांचे काम कंत्राटदारांमार्फत करून घेत आहेत. थकबाकी लवकर न भरल्यास पेपर डॉल एंटरटेनमेंट आणि निर्माता अहमद खान यांच्यासोबत काम न करण्याचा इशाराही युनियनने या निवेदनात दिला आहे.

हे देखील वाचा