Saturday, July 6, 2024

‘तुरू तुरू चालू नको’, म्हणत शालूने शेअर केला तिचा अफलातून व्हिडिओ, तिच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. २०१३ साली नागराज मंजुळे एक वेगळी कहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर आले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘फॅन्ड्री.’ या चित्रपटाला खास करून ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता.

या चित्रपटाच्या कहाणीसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री देखील चांगलीच लोकप्रिय झाली. ती अभिनेत्री सगळ्यांची लाडकी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात. राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या पारंपरिक लूकपासून ते अगदी हॉट आणि बोल्ड लूकचे ती तिच्या चाहत्यांना दर्शन देत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ चाहत्यांना घायाळ करत आहे.(Actress Rajeshwari kharat share her dance video on social media)

राजेश्वरीने अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अगदी मराठमोळ्या साजशृंगारात दिसत आहे. तिने आकाशी रंगाची एक सुंदर साडी नेसली असून, यासोबत तिने काळ्या रंगाचा ब्लाऊज घालून काळ्या रंगाचा कंबरपट्टा लावला आहे. यासोबतच गळ्यात मोठा हार, हातात बांगड्या, कपाळी टिकली आणि नाकात मोठी नथ असा सगळा साजशृंगार केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा लूक आणि हावभाव अप्रतिम दिसतात.‌ या व्हिडिओमध्ये ती ‘तुरूतुरू चालू नको’ या गाण्यावर आरशासमोर हावभाव करताना दिसत आहे.

राजेश्वरीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतवर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटोला तसेच व्हिडिओला ते भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया दर्शवत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच तिने तिच्या आगामी ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात ती वेशा भूमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?

हे देखील वाचा