Friday, July 5, 2024

राजेश्वरी खरातचा स्विमिंग पूलमधील सिझलिंग अवतार व्हायरल, ग्लॅमरस लूकने लावली पाण्यात आग

सोशल मीडिया हे आता अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ झाले आहे. प्रत्येकजण आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. यात अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडिया युजर्सपैकी एक आघाडीची युजर आहे. दररोज न चुकता ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. राजेश्वरीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स घातले आहेत. या व्हिडिओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये उभी दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. राजेश्वरीने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राजेश्वरीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिने या आधी देखील जेवढे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्या सगळ्या फोटो आणि व्हिडिओला देखील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे. (marathi actress rajeshwari kharat’s video viral on social media)

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा