जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, तेव्हा आपण सतत त्याच व्यक्तीचं नाव पुटपुटतो. मित्रमंडळींमध्येही त्याच व्यक्तीबद्दल सांगत असतो. कधीकधी असं होतं, त्याच्या आठवणीत करमतही नाही. मग तो आवडता अभिनेता असो, अभिनेत्री असो किंवा गर्लफ्रेंड असो. असेच काहीसे सध्या बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत हिच्याबाबत घडत आहे. राखीला नवीन प्रेम मिळाले आहे. यामुळे ती भलतीच आनंदात आहे.
राखी सावंत (Rakhi Sawant) प्रत्येक ठिकाणी आदिल (Adil) याच्यासोबत दिसत आहे. राखी जर कोणाबाबत बोलत असेल, तर ते फक्त आदिलबाबत असते. मात्र, जेव्हा इतके प्रेम असते, तेव्हा भांडणंही होतातच. राखी आणि आदिल एकमेकांना लाथा बुक्क्या मारताना दिसत आहेत. खरं तर राखी आणि आदिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी आदिलसोबत भांडताना दिसत आहे.
View this post on Instagram
भांडण नाही, तर मजेशीर भांडण
राखी सावंत आणि आदिल (Rakhi Sawant And Adil) यांच्यात किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राखीच्यात आयुष्यात जेव्हापासून आदिल आला आहे, तेव्हापासून ती खूप बदलल्याचे चाहते म्हणत आहेत. मग तिच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल असो किंवा मग बोलण्याबाबत असो. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी आदिलसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून चाहतेही खुश झाले आहेत.
राखी आदिलसोबत करणार का लग्न?
राखीच्या चाहत्यांना हा प्रश्न खूपच सतावत आहे. त्यामुळे ते नेहमी तिला विचारत असतात की, ती लग्न कधी करणार आहे. दुसरीकडे, आता राखीनेही सांगितले आहे की, आदिल तिला खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो. दुसरीकडे, आदिलच्या बहिणीचे लग्न झालेले नाहीये. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या लग्नावर निर्णय घेतील. विशेष म्हणजे, राखीच्या आईलादेखील आदिल खूप आवडतो. नुकतेच राखीने हे जाहीर केले की, जेव्हा तिने आपल्या आईला आदिलबद्दल सांगितले, तेव्हा ती रडू लागली आणि भावूक होत म्हटले की, आयुष्यात त्यांच्या मुलीने खूप काही सहन केले आहे, आता तिने आपले आयुष्य मोकळेपणाने जगले पाहिजे.
राखीबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘बुढ्ढा मर गया’, ‘मैं हूं ना’, यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. तिने अधिकतर सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसोबतच डान्स नंबर वन केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पॅरिसमध्ये सुट्यांची मजा लुटतोय ऋतिक रोशन, पोस्ट होतेय व्हायरल
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल










