Friday, April 19, 2024

सलमान खानला मामा बनवू इच्छिते राखी सावंत, बॉयफ्रेंड आदिलबद्दल अभिनेत्री बोलली ‘ही’ मोठी गोष्ट

राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या बॉयफ्रेंड आदिल हुसैन दुर्रानीच्या प्रेमात आहे. ती अनेकदा आदिलसोबत हँग आउट करताना दिसते. या दिवसांत राखी सावंत बॉयफ्रेंडबद्दल खुलेपणाने बोलत असते. यासोबतच ती त्याच्यासोबत तिचे भविष्याचे प्लॅनिंगही करत आहे. दरम्यान, बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनने सलमान खानने (Salman Khan) लवकरच तिच्या मुलांचा मामा व्हावे, अशी तिची इच्छा असल्याचे म्हटले आहे. राखी सावंत गुरुवारी (३० जून) मुंबईत दिसली. यादरम्यान ती बॉयफ्रेंड आदिल हुसैन दुर्रानीबद्दल खूप गप्पा मारल्या.

राखी सावंत सलमान खानला तिचा सर्वात आवडता अभिनेता मानते. यासोबतच ती नेहमीच त्याची स्तुती करत असते. सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “मला एक दिवस सलमान (खान)जींना मामा बनवायचे आहे. सलमान जी, तुम्ही मामा कधी होणार? अरे हे तर माझ्याच हातात आहे! (rakhi sawant says she wants salman khan to be mama of her child)

इथे पाहा राखी सावंतचा व्हिडिओ

याशिवाय राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल हुसैन दुर्रानीबद्दलही खूप बोलली. राखी सावंतचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप पसंत पडला. तसेच कमेंट करून नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

राखी सावंत गेल्या काही काळापासून आदिल हुसैन दुर्रानीला डेट करत आहे. यापूर्वी ती रितेशसोबतच्या लग्नामुळे चर्चेत होती. राखी सावंतचा पतीसोबत बराच वादही झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा