बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही इंडस्ट्रीतील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतेच कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि आता तो शांत होण्याचे नाव घेत नाहीये. यावेळी कंगनाने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वक्तव्य करून खूप मोठा वाद ओढवून घेतला आहे. या वादाचे कारण म्हणजे २०१४ मध्ये भारताला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचे तिने म्हटले आहे.
कंगनाने एका मुलाखतीत म्हटले आहे की, “१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते आणि जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते २०१४ मध्ये मिळाले आहे.” कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिने हे वक्तव्य केल्यापासून तिच्यावर अनेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत आहेत. त्याचवेळी आता अभिनेत्री राखी सावंतनेही कंगनाचा व्हिडिओ शेअर करत तिला गद्दार म्हटले आहे.
राखीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगना माईक घेऊन बोलत आहे. मात्र, तिच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत आहे. व्हिडिओ शेअर करत राखीने लिहिले आहे, ”देशाची गद्दार आहे दीदी…”
यापूर्वी भाजप खासदार वरुण गांधी म्हणाले होते, “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान… तर कधी त्यांच्या मारेकऱ्यांचा आदर… आता भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस… आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा अवमान… या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की, देशद्रोह?”
कंगनाविरोधात अनेक शहरांमध्ये आहेत गुन्हे दाखल
राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, उदयपूर आणि चुरू या चार शहरांमध्ये महिला काँग्रेसने कंगनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर काही लोकांनी रस्त्यावर तिचे पुतळेही जाळले. कंगनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घेण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
काय म्हणाली कंगना?
आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगना रणौतने गुरुवारी (११ नोव्हेंबर) भारताला २०१४ मध्ये ‘खरे स्वातंत्र्य’ मिळाल्याचे सांगून वाद निर्माण केला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘भीक’चे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो; म्हणाली, ‘एक गाणे…’
-का ‘या’ व्यक्तीची दुसरी पत्नी बनली जुही चावला? अनेक वर्षांनी केला लग्न लपवण्यामागचा खुलासा
-भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मिळवले आणखी एक घवघवीत यश










