Sunday, May 3, 2026
Home अन्य भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मिळवले आणखी एक घवघवीत यश

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मिळवले आणखी एक घवघवीत यश

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा देशातील सर्वात लोकप्रिय शो आहे. जर तुम्हाला त्यातील जेठालाल, टपू, भिडे किंवा इतर कोणाती पात्रे माहीत नसतील, तर तुम्ही दुसऱ्या जगात राहत असाल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा कौटुंबिक कॉमेडी शो मनोरंजन टेलिव्हिजनवर राज्य करत आला आहे आणि अजूनही करतोय. विशेष म्हणजे, नुकतेच या शोने ३३०० एपिसोड पूर्ण केले आहेत. या खास प्रसंगी, शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच चाहत्यांना हसवण्याचे आश्वासन दिले.

भावुक झाले निर्माते
असित कुमार मोदी म्हणाले, “तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा केवळ शो नाही, तर ती एक भावना आहे. ३३०० भाग म्हणजे, आणखी एक मैलाचा दगड पार केला गेला आहे. तरीही ती फक्त एक संख्या आहे. आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा शो गेल्या तेरा वर्षांत लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात यशस्वी झाला आहे. इतक्या वर्षांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल मी सर्व प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानतो. जीवन हास्य, आनंद आणि सकारात्मकतेने भरेल असा कंटेंट तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” (taarak mehta ka ooltah chashmah achieved another milestone made a record of 3300 episodes)

‘या’ दिवशी झाली होती सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ २८ जुलै २००८ रोजी सुरू झाला आणि आता १३ वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे चालू आहे. ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय सिटकॉम देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या शोने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला होता. मात्र, दयाबेन उर्फ ​​दिशा वकानीच्या अनुपस्थितीमुळे हा शो काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिशा वकानीला शेवटची दयाबेनच्या भूमिकेत दिसल्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. २०१७ पासून ती शोपासून दूर आहे.

‘या’ पात्राने घेतला निरोप
दरम्यान, नुकतेच घनश्याम नायक यांचे निधन झाले. या शोमध्ये ते नट्टू काकांची भूमिका साकारत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा