Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘लाल साडी, जड दागिने’, करवाचौथच्या दिवशी नववधूच्या लूकमध्ये दिसली राखी सावंत

‘लाल साडी, जड दागिने’, करवाचौथच्या दिवशी नववधूच्या लूकमध्ये दिसली राखी सावंत

देशभरात करवा चौथचा सण रविवारी (२४ ऑक्टोबर) साजरा करण्यात आला आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. करवा चौथ आणि बॉलिवूडचे विशेष नाते आहे. मेहंदी, सर्गी, चाळणीतून चंद्र पाहण्यापासून ते उपवास तोडण्यापर्यंत, हा सण बॉलिवूड चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर आणि रोमँटिक पद्धतीने सादर केला जातो. सर्वसामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत सर्वजण या निमित्ताने सजून चंद्राकडे पाहताना दिसत होते. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले, तर कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते त्यांच्या जोडीदारासोबत करवा चौथ साजरे करताना दिसत आहेत. राखी सावंतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सजलेली दिसत आहे. तिने पोस्टसह लिहिले की, “चंद्र उगवण्याची वाट पाहत आहे.”

पारंपारिक लूकमध्ये राखी सावंत
राखीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली असून, त्यावर सोनेरी रंगाची जरी वर्क केलेली आहे. तिने जड दागिने घातले आहेत. यासोबतच मोठी बिंदी आणि लांब वेणी घातली आहे. राखी पूर्णपणे पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. यात ती नव वधूपेक्षा कमी दिसत नाहीये. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा.”

अभिनेत्री रिद्धिमा पंडितने या फोटोवर लिहिले की, “अरे वाह राखी राणी.” पवित्र पुनियाने हसणाऱ्या डोळ्यांच्या हृदयाचे ईमोजी बनवले आहेत.

शेअर नाही केला पतीचा फोटो
राखी सावंतने २०१८ मध्ये एनआरआय बिझनेसमॅन रितेशसोबत लग्न केले होते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले. ज्यात ती वधूच्या रुपात दिसली. राखीने तिच्या पतीचा फोटो कधीच शेअर केला नाही. तसेच तो कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. राखीने ‘बिग बॉस’ घरात राहत असतानाही अनेकवेळा तिच्या पतीचा उल्लेख केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्रिय मोदीजी अमेरिका दौऱ्यावरुन येताना माझ्यासाठी ‘या’ गोष्टी आणा’, राखी सावंतची पंतप्रधानांकडे अजब मागणी

-‘लोकांना असे वाटते की मी…’, म्हणत राखीने शेअर केले तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो

-ट्विंकल खन्नाने केले ‘वन मॅन आर्मी’ असलेल्या राखी सावंतचे कौतुक, राखीने मानले आभार

हे देखील वाचा