‘प्रिय मोदीजी अमेरिका दौऱ्यावरुन येताना माझ्यासाठी ‘या’ गोष्टी आणा’, राखी सावंतची पंतप्रधानांकडे अजब मागणी


बॉलिवूड किंवा टीव्हीवरील मालिका असो नाहीतर राजकारण असो. या सर्वांमध्ये स्वतःचं मत नाही मांडलं, तर ती राखी कसली! बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून राखीला ओळखले जाते. तिने केलेल्या वक्तव्यांवर कोणी तिला फालतू म्हणतं, तर कोणी तिची वाहवा करतं. अशात ड्रामा क्वीनने आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदेश दिले आहेत. तिने त्यांना तिच्या कामांची आणि इच्छांची मोठी यादीच वाचून दाखवली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री ९.०० च्या सुमारास ते ‘व्हाईट हाऊस’मध्ये दाखल झाले. तिथे जो बायडन यांची भेट घेण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मोदी तेथे गेले आहेत. अशात ड्रामा क्वीनला तिच्या एका चाहत्याने मोदींच्या अमेरिकेतील दौऱ्यावर प्रश्न विचारला. यावर राखीचे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. (Pm narendra modi reached America rakhi sawant made a big dimand list see this funny video)

तिच्या एका चाहत्याने विचारले की, “मोदींना तू काय सांगशील?” तेव्हा त्यावर ती उत्तर देताना पहिले थोडी थांबली. थोडा विचार केला आणि म्हणाली की, “नमस्कार मोदी जी. मला छान वाटत आहे तुम्ही अमेरिका दौरा करत आहात. तिथे आपले जे भारतीय नागरिक आहेत त्यांना माझा संदेश द्या की, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही भारतात जेव्हा याला तेव्हा माझ्यासाठी थोडी शॉपिंग करून या. अमेरिकेतील डॉलर घेऊन या माझ्यासाठी.”

पुढे तिला तिचा एक चाहता म्हणतो की, रितेश जी बिग बॉसच्या १५ व्या पर्वात झळकणार आहे. यावर ती लाजत म्हणते की, “हो लवकरच तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज येणार आहे.” परंतु तिने त्याविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही.

राखीचे सर्वच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या तिला वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. तसेच तिच्या पतीला अजून कोणी पाहिले नाही. जर तो बिग बॉसच्या घरात आला, तर सर्वांना पहिल्यांदाच राखीच्या पतीला पाहता येईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज


Leave A Reply

Your email address will not be published.