Friday, July 5, 2024

Challange | राखी सावंतचे कंगना रणौतला खुले आव्हान; म्हणाली, ‘तुझ्यात दम असेल तर…’

बॉलिवूडमध्ये ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत निर्दोषपणे व्यक्त करते. याच स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. केवळ कंगनाच पंगा क्वीन म्हणून ओळखली जात नाही, तर राखी सावंत (Rakhi Sawant) देखील कोणापेक्षा कमी नाही. आता राखीने कंगनाच्या एका वक्तव्यावरुन थेट कंगनाशी पंगा घेतला आहे आणि ‘लॉकअप’ शो वर्षभर चालवण्याचे आव्हान दिले आहे. कंगना सध्या एकता कपूरच्या नवीन शो ‘लॉकअप’मुळे चर्चेत आहे. नुकतेच शोच्या लॉन्चिंगवेळी कंगना म्हणाली की, हे तुझ्या भाईचे घर नाही. कंगनाने सलमानच्या बिग बॉस शोवर हे वक्तव्य कथितपणे केले होते. यावर आता राखी सावंतने कंगनाला उत्तर दिले आहे.

काय म्हणाली कंगना?
‘लॉकअप’च्या लॉन्चिंगवेळी कंगना म्हणाली होती की, “हे तुझ्या भाईचे घर नाही, हे माझे जेल आहे. प्रत्येक स्पर्धकाच्या फाईल्स आणि सत्य माझ्याकडे असेल.” सलमान खानच्या ‘बिग बॉस’ शोवर निशाणा साधत तिने हे म्हटले आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

राखीने कंगनाला दिले चॅलेंज
राखी एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती, जिथे तिने कंगनाच्या ‘हे तुझ्या भाईचे घर नाही’ याचे उत्तर दिले. ती म्हणाली की, “हे तुझ्या भाईचे घर नाही, असे कंगना म्हणाली तेव्हा मला खूप वाईट वाटले. मग ऐक बहिण, भाई खूप काळापासून शो चालवत आहे. तुझ्यात दम असेल, तर वर्षभर चालवून दाखव.” राखी म्हणाली की, “भाई १५ वर्षांपासून हा शो चालवत आहे, भाईकडे खूप दम आहे, पण बहिणीकडे दम नाही.”

याशिवाय राखी सावंत पुढे म्हणाली, “मी बहिणीला एवढेच सांगू इच्छिते की, बहीण जीभेवर नियंत्रण ठेव. तू आमच्या बॉलिवूडला खूप शिव्या देत होतीस, तू परत आलीस का? म्हणूनच मी म्हणते की, बॉलिवूडचा गैरवापर करू नको. शेवटी फक्त बॉलिवूडचीच गरज भासेल. त्याचवेळी पाण्यात राहून मगरीचा द्वेष करू नये.”

‘लॉकअप’ या शोमध्ये येण्याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली की, “मला बोलावले गेले, तर मी या शोमध्ये नक्की येईन, पण मी कंगनासाठी नाही, तर हा शो एकता कपूरचा आहे, यासाठी येईल. कारण मी एकता कपूरची फॅन आहे आणि ती माझी आदर्श आहे.” त्याचबरोबर राखी सावंत ही अशी अभिनेत्री आहे जिला चालते-बोलते फिरणारे मनोरंजन मानले जाते.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा