कंगना रनौत (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील पंगा क्वीन म्हणून ओळखली जाते. ती समाजात चालणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींवर तिचे मत व्यक्त करते. कंगनाला तिच्या परखड मतांमुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे ओळखले जाते. कंगना इतकी तिच्या चित्रपटांमुळे गाजत नसेल तितकी ती तिच्या वादांमुळे आणि वक्तव्यांमुळे गाजते. नुकतेच कंगनाने दीपिका पदुकोणच्या गेहराइया सिनेमाला अश्लीलतेला भर घालणारा सिनेमा म्हटले होते. आता पुन्हा एकदा कंगनाने एका सिनेमावर भाष्य केले आहे. हा सिनेमा आहे, आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi).
लवकरच आलियाचा हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार असून, सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. कंगनाने याच प्रमोशनवर आक्षेप नोंदवत तिचे याबद्दलचे मत व्यक्त केले आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमातील वेशभूषेत एक लहान मुलगी दिसत असून, ती या सिनेमाचे संवाद आलियाच्याच अंदाजमध्ये म्हणणाऱ्या मुलीचा व्हिडिओ तुफान गाजत आहे. याच व्हिडिओवर कंगनाने काही वक्तव्य केली आहेत.

हे ही बघा: बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमांच्या स्टोरी आहेत ढापलेल्या
कंगनाने याबद्दल भाष्य करताना तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “सरकारने अशा सर्व पालकांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे, जे अशा चित्रपटाच्या प्रमोशनच्या मार्गातून पैसा कमावत आहे. जो सिनेमा नाबालिक मुलांचे शोषण करत असून, एका प्रसिद्ध वैश्या आणि तिच्या दलालांवरील बायोपिक आहे. ज्या दलालांनी त्यांची ताकद वाढवण्यासाठी माजी प्रधानमंत्री असलेल्या जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांना मुली पुरवल्या होत्या. महिला आणि बाल विकास मंत्री असलेल्या स्मृती इराणी कृपया यात लक्ष घाला.”

पुढे कंगनाने लिहिले, “खरंच या मुलीने तोंडात बिडी घेऊन अश्लील संवाद म्हणत, सेक्स वर्कर असलेल्या महिलांची नक्कल केली पाहिजे? तिची बॉडी लँग्वेज बघा? या वयात यांना असे कामुक दाखवणे योग्य आहे का? असे अजून शेकडो मुलं आहेत ज्यांचा असा वापर केला जात आहे. आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ सिनेमा येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असून, संजय लीला भन्साळी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा :










