Monday, July 8, 2024

राखीने इंजेक्शन देणाऱ्या नर्सला प्रश्न विचारताच नेटकऱ्याची कमेंट चर्चेत; म्हणाला, ‘सुई आत, बूस्टर बाहेर’

प्रसिद्धी पिपासू अभिनेत्री राखी सावंत ही दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती रिक्षाच्या मागे फावडे घेऊन धावल्यामुळे चर्चेत आली होती. आता यावेळी तिने वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राखीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कोरोनावरील बूस्टर डोस घेण्यासाठी पोहोचली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते लोटपोट झाले आहेत.

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही बूस्टर डोस (Booster Dose) घेण्यासाठी विचित्र केशभुषेत पोहोचल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच, राखीने सोनेरी रंगाचे खोटे केसही डोक्यावर लावले आहेत. विगमध्ये ती खूपच मजेशीर दिसत आहे. तिचा हा लूक अनेक चाहत्यांना आवडला नाही. अनेक चाहते तिच्या केसांवरून प्रश्नांचा भडीमार करताना दिसत आहेत. एका चाहत्याने राखीला ‘नौटंकी’ म्हणले आहे.

या व्हिडिओत राखी म्हणते की, “आज मी बूस्टर लावण्यासाठी आले आहे. प्रत्येक ठिकाणी लोक आजारी पडत आहेत. ताप, ताप होत आहे.” यानंतर नर्स राखीला डोस लावण्यासाठी येते, तेव्हाच राखी सुईकडे पाहून जोरजोरात ओरडू लागते. इंजेक्शन लावल्यानंतर राखी म्हणते की, “मी आज बूस्टर डोस घेतला आहे, जेणेकरून मी आजारी पडणार नाही. मी सतत प्रवास करत आहे.”

चाहते तिची रिऍक्शन पाहून तिची थट्टा उडवत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “राखीने इतकी सर्जरी केली आहे, तर तिला इंजेक्शनची कसली भिती वाटते?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सुई आत आणि बूस्टर बाहेर.” आणखी एक चाहता म्हणाला की, “इंजेक्शन घेतल्यानंतर विचारत आहे, सुरक्षित आहे ना.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या तिच्या नवीन रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. ती तिचा बॉयफ्रेंड आदिल (Adil) याच्यामुळे सतत माध्यमांमध्ये झळकत आहे. नुकतेच दोघांनीही डेट करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पार्टीमध्ये दोघे झळकत असतात. काही दिवसांपूर्वी राखीने आदिलसोबतचा हॉटेलमधील व्हिडिओही शेअर केला होता. राखी या नात्यामुळे खूप खुश असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, दोघेही लग्नाची योजनाही बनवत आहेत. राखीने आईदेखील बनायची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मिथुन चक्रवर्तींची सून म्हणतेय ‘नको गं बाई’, लग्नाच्या चार वर्षांनंतरही बनायचं नाही आई

अभिनयासाठी खाल्ला वडिलांचा मार, आईकडून ५०० रुपये घेत पोहोचला मुंबईत; आता कोटींचा बनलाय मालक

प्रतिभा असूनही एका संधीसाठी करावा लागला संघर्ष, ‘या’ सिनेमाने रातोरात चमकलेलं अभिनेत्रीचं नशीब

हे देखील वाचा